27.1 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानपारस डिफेन्सकडून महाराष्ट्रात ₹12,000 कोटींच्या भव्य गुंतवणुकीची घोषणा,

पारस डिफेन्सकडून महाराष्ट्रात ₹12,000 कोटींच्या भव्य गुंतवणुकीची घोषणा,

पहिल्या ऑप्टीक्स् पार्क निर्मितीकरिता दावोस येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी


पुणे : पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड (पारस डिफेन्स) हे संरक्षण आणि अंतराळासाठी ऑप्टिक्स आणि ऑप्ट्रॉनिक प्रणालींमध्ये अग्रेसर असून, त्यांच्याकडून महाराष्ट्रात भारतातील पहिले ऑप्टिक्स पार्क उभारण्यासाठी रु. 12000 कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संदर्भात संरक्षण कंपनीने महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार (एमओयू) केला. स्वित्झर्लंडमधील दावोस येथील प्रतिष्ठित जागतिक आर्थिक मंचावर करण्यात आलेल्या या घोषणेमुळे प्रगत ऑप्टिकल टेक्नॉलॉजीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
ही मोठी गुंतवणूक एक अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र तयार करण्यासाठी सज्ज आहे. या पुढाकारामुळे भारताच्या ऑप्टीक्स् आणि ऑप्टीकल सिस्टीम क्षेत्राला नवीन आकार मिळेल. तसेच ऑप्टीकल सिस्टीममधील ग्लोबल लिडर म्हणून स्वतःला स्थापित करेल. महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये तांत्रिक स्वातंत्र्याच्या भारताच्या आकांक्षांना पुढे नेताना ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाप्रती पारस डिफेन्सच्या वचनबद्धतेचीही याद्वारे पुष्टी होणार आहे. या प्रकल्पामुळे थेट रोजगाराच्या 2,000 हून अधिक संधी निर्माण होतील आणि संरक्षण, अंतराळ, वाहन, औद्योगिक आणि व्यावसायिक अनुप्रयोग (अॅप्लिकेशन)सारख्या प्रमुख उद्योगांमध्ये तांत्रिक प्रगतीला चालना मिळेल.
नियोजित सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत, महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जमीन, विविध प्रोत्साहन आणि मंजुरी मिळविण्यासाठी पारस डिफेन्सला सर्वसमावेशक पाठबळ देण्याचे वचन दिले आहे. या घोषणेबद्दल बोलताना पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मुंजाल शरद शाह म्हणाले, “ऑप्टिक्स पार्क भारताच्या तांत्रिक क्षमतांना पुढे नेण्यासाठी आमची अतूट वचनबद्धता दर्शवते. हा क्रांतिकारी प्रकल्प केवळ देशांतर्गत उत्पादन परिसंस्थेला चालना देणार नाही तर ग्लोबल इनोव्हेशन हब म्हणून भारताचे स्थान मजबूत करेल. आमचे ऑप्टीक्स् पार्क तांत्रिक अंतर भरून काढेल आणि सर्व क्षेत्रांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, नवोन्मेष आणि वाढीच्या संधी निर्माण करेल. हा उपक्रम पारस डिफेन्स आणि भारताच्या तांत्रिक आकांक्षा या दोन्हींसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
या भागीदारीवर भाष्य करताना महाराष्ट्र सरकारचे प्रवक्ते म्हणाले, “संरक्षण, अंतराळ, ऑटोमोटिव्ह, सेमीकंडक्टर आणि इतर अनुप्रयोग/अॅप्लिकेशनसाठी ऑप्टिकल टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण संशोधन तसेच तांत्रिक नेतृत्वाला चालना देण्याच्या दिशेने पारस डिफेन्सबरोबर भागीदारीचा आम्हाला अभिमान आहे. हा प्रकल्प राज्याला प्रगत उद्योग आणि गुंतवणुकीचे केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.”
परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व दूर करून, ऑप्टिक्स आणि ऑप्टिकल सिस्टीमसाठी भारताला स्वावलंबी केंद्र (सेल्फ-रेलियंट हब)मध्ये रूपांतरित करण्याच्या पारस डिफेन्सच्या दृष्टिकोनाचा ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट, ऑप्टिक्स पार्क हा आधारस्तंभ आहे. पारस डिफेन्स’ने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामार्फत मार्गदर्शक संस्था, आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि भांडवली बाजारपेठा, थेट परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणूकदार इत्यादींमधील प्रवेशाचा लाभ घेण्याची योजना आखली आहे.
विस्तारक्षमता आणि लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी ऑप्टीक्स् पार्क प्रोजेक्ट 2028 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होईल आणि 2035 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
ऑप्टीक्स् पार्क प्रोजेक्टच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहेः
· सर्वसमावेशक पायाभूत सुविधाः कच्चा माल विकास, ऑप्टिकल असेंब्ली, प्रगत सिस्टीम टेस्टिंग आणि अकॅडमी फॉर ऑप्टिक्स अँड अलाइड टेक्नॉलॉजीजसाठी सुविधा.
· प्रगत तंत्रज्ञानः सिलिकॉन आणि जर्मेनियम वाढविणारे तंत्रज्ञान, एमईएमएस-आधारित सेन्सर्स, सेमी-कंडक्टर मटेरियल, अडॅप्टिव्ह ऑप्टिक्स आणि अत्याधुनिक लेसर सिस्टमचा विकास.
· विविध अनुप्रयोगः क्वांटम कम्युनिकेशन, अँटी-ड्रोन सिस्टीम आणि हाय-स्पीड इमेजिंगसाठी ऑप्टिकल सिस्टीम.
· ऑप्टिकल मटेरियल: जर्मेनियम, सिलिकॉन, झिंक सेलेनियाड आणि ग्लास सिरेमिक मटेरियल तंत्रज्ञानासह कच्च्या मालाचा विकास, ज्याचा वापर ऑप्टिकल सिस्टीम्स, सेमीकंडक्टर उत्पादने, स्पेस कंपोनेंट्स इत्यादी विविध अनुप्रयोग/अॅप्लिकेशनसाठी केला जाऊ शकतो.
हे ऑप्टीक्स् पार्क भारताला हवाई उड्डयन, संरक्षण, ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर, अंतराळ, वैद्यकीय, कृषी, सुरक्षा आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये उपयोजित इमेजिंग टेक्नॉलॉजी विकसित करण्यास मदत करेल आणि भारताला प्रगत तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर आणेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
27.1 ° C
27.1 °
27.1 °
89 %
4kmh
100 %
Mon
30 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!