28.1 C
New Delhi
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्ररील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन!

रील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन!

नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणारी करसंकलन विभागाची अभिनव स्पर्धा…

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर taxआकारणी व कर संकलन विभागामार्फत सध्या मालमत्ताकर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू असून थकबाकीदारांच्या थकीत रकमेवर प्रतिमहिना २ टक्क्यांचा विलंब दंडही pcmc fine वाढत आहे. त्याबरोबरच ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाईही सुरू आहे. यामुळे करसंकलन विभागाकडून नागरिकांनी कर भरण्यासाठी रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून आवाहन करावे. यासाठी ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालमत्ताकर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी करसंकलन विभागाने लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे. जे रीलस्टार, संगीतकार singer, रॅपर असतील, अशांनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करावे, असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

अशा आहेत स्पर्धेच्या नियम व अटी…
1)    रील, गाणे, रॅप व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील कोणताही भाग घेऊ नये, तसेच कॉपीराईट कायद्याचे पालन करावे
2)    रील व्हिडीओ ओरिएन्टेशन पोर्टेट असावे
3)    रील व्हिडीओ ६० ते ९० सेकंदांचा असावा
4)    फेसबुक व इन्स्टाग्राम अथवा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे किमान दोन हजारांवर फॉलोअर्स असणे आवश्यक आहे
5)    रील्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणी फॉर्म मनपाच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे
6)     सदर स्पर्धेचा कालावधी १ ते १५ फेब्रुवारी २०२५. स्पर्धकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत आपले रील आपल्या आयडीवरून पोस्ट करून इन्स्टाग्रामवरील @pcmc_pimprichinchwad या अकाउंटला कोलॅब करा. याबरोबर, फेसबुक व एक्स या व्यासपीठावर पोस्ट केल्यास आमच्या फेसबुक @Pimpri Chinchwad Municipal Corporation व एक्सच्या @pcmcindiagovin या सोशल मीडिया हॅंडलला टॅग करा.
7)    आपल्या अंकाउंटवरून रील पोस्ट केल्यानंतर त्याची लिंक सदर ptax@pcmcindia.gov.in या ईमेलवर मेल करावी
8)    आपण अपलोड केलेली रील, गाणे व रॅप यांचे दृश्य, आवाज स्पष्ट ऐकू व दिसेल, असा त्याचा दर्जा उत्तम असावा
9)    रील्समधून धर्म, जात, पंथ यांच्या उल्लेखाने सामाजिक वातावरणास तेढ निर्माण होईल, असे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे चित्रण असलेले रील्स ग्राह्य धरले जाणार नाहीत. याबरोबरच कोणाच्याही भावना दुखावतील, असा आशय असलेले रीलही स्पर्धेतून बाहेर होतील
10)    रील्स स्पर्धेचा निकाल हा रील्सचे लाईक, दर्शकसंख्या (व्ह्यूव्ह्स), आशय, मांडणी, विषयाला दिलेला न्याय आदीवर ठरविला जाईल. स्पर्धेस निकालायोग्य प्रतिसाद आला नाही, तर स्पर्धा स्थगित करण्याचे स्वांतत्र्य आयोजकांकडे राहील
11)    रील्स स्पर्धेबाबत निर्णयप्रक्रिया, बदल, निवड आदीबाबतचे सर्व अधिकार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे राहतील
12)   आपण स्पर्धेसाठी केलेले रील हे मालमत्ताकराबाबत जनजागृतीसाठी असून त्याचा इतर कुठेही वापर करण्यात येणार नाही

विजेत्यांना मिळणार लाखाचे बक्षीस…
१) प्रथम क्रमांक – ५०,००० रुपये व प्रशस्तिपत्र
२) द्वितीय क्रमांक – ३०,००० रुपये व प्रशस्तिपत्र
३) तृतीय क्रमांक – २०,००० रुपये व प्रशस्तिपत्र

या विषयांबाबत करावे रील, गाणे, रॅपच्या माध्यमातून आवाहन…
१) मालमत्ताकर भरायची करा घाई, नाही तर होईल जप्तीची धडक कारवाई!
२) पाणीपट्टी आजच भरा, नळकनेक्शन होण्याची कारवाई टाळा!
३) तुमचा थकला आहे मालमत्ताकर? त्यावर वाढतोय विलंब दंड!
४) शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी मालमत्ताकराचा भरणा करा!

कोट – मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सर्जनशील कलाकरांनी प्रतिसाद द्यावा!
करसंकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये करसंकलनामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. करसंकलन विभागामध्ये नागरिकांना कर भरण्यासाठी विविध माध्यमातून आवाहन करून जनजागृती करण्यात आली. कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी सर्जनशील कलाकारांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर उत्तम आशयाची निर्मिती करून नागरिकांना ते प्रचंड भावले. त्याच धर्तीवर चालू वर्षीही करसंकलन विभागाने रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धेस मागील वर्षीप्रमाणे प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवावा.

  • प्रदीप जाभंळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

‘मी जबाबदार करदाता’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त क्रिएटर्सनी सहभाग घ्यावा!
करसंकलन विभाग विविध माध्यमातून मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी पुढाकार घेतो आहे. आम्ही नागरिकांना मालमत्ताकराबाबत माहिती मिळण्यासाठी व त्यांना आवाहन करण्यासाठी एसएमएस पाठवित असून सोशल मीडिया व आदी बाबींचीही मदत घेतो आहोत. करसंकलन विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील जागरूक मालमत्ताधारकांनी सदैव जागरूकपणे कराचा भरणा केला आहे. त्यामुळे चालू वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून करसंकलन विभागाची सुरू असलेली मालमत्ताकराबाबत थकबाकी वसुली मोहीम व मालमत्ता जप्ती मोहिमेबाबत माहिती मिळावी व नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करावा, यासाठी रील, गाणे व रॅप या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी क्रिएटर्सनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.

  • अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
42 %
0kmh
40 %
Thu
30 °
Fri
36 °
Sat
35 °
Sun
35 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!