31 C
New Delhi
Tuesday, July 15, 2025
Homeदेश-विदेशडॉ. शरद गोरे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगले कवी संमेलन

डॉ. शरद गोरे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगले कवी संमेलन

खुल्या कवी संमेलनात २६० कवींचा २२ तासांचा विक्रम


दिल्ली, : दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील शेकडो कवींनी स्वरचित कविता सादर करून कवी संमेलनात अनोखा विक्रम नोंदवला. नवतरुणी तिचे सौंदर्य, प्रेम प्रकरण, प्रेमभंग, निसर्ग कविता, निसर्गाचे विविध रूप, शेतकऱ्यांची व्यथा, शाळा, शाळेतील आठवणी, व्यवस्थेतील प्रश्न, सरकारचा अनास्थेपणा, राजकारण, समाजकारण, गाव, शहर, आदींवर भाष्य करणाऱ्या कवितांनी दिल्लीतील तालकटोरा येथील छत्रपती शिवाजी नगरीतील सयाजीराव गायकवाड सभामंडपात कवी संमेलनाने तब्बल २२ तासाहून अधिक काळ सुरू राहण्याचा विक्रम केला. डॉ. शरद गोरे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने हे कवी संमेलन रंगले होते. ९८ वर्षात पहिल्यांदाच झालेल्या या खुल्या संमेलनामुळे अनेक नवोदित पण दर्जेदार कवींना संधी मिळाली. डॉ. शरद गोरे Dr Sharad Gore यांच्या प्रयत्नांमुळे या ऐतिहासिक विचारपीठाची निर्मिती झाली.

राज्यभरातून आणि महाराष्ट्र बाहेरील आलेल्या कवींनी आणि त्यांना दाद देणाऱ्या काव्यप्रेमींनी दिवसभर सयाजीराव गायकवाड सभामंडप हाऊसफुल झाला होता. रात्री दहा पर्यंत या सभामंडपात मोठ्या प्रमाणात गर्दी ओसंडून वाहत होती.

श्रीमंत सयाजीराव गायकवाड सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आहे होते. या संमेलनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदीप पाटील, आयएएस रोहिणी भाजीभाकरे, युवराज नळे, ज्ञानेश्वर मोळक, विक्रम मालन आप्पासो शिंदे, महिला व बालकल्यांच्या प्रशासकीय अधिकारी सुवर्णा चव्हाण, रमेश रेडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी देहू येथून आलेले तुकाराम महाराजांचे वंशज रामदास महाराज मोरे यांच्यासह देहूतील इतर वारकऱ्यांसह सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच प्रशासकीय अधिकारी सुवर्णा पवार लिखित मॉरीशस एक प्रवास, प्रतिभा मगर लिखित उन्हाळीवाटा, गणेश चप्पलवार लिखित कृषी पर्यटक उद्योजकांची यशोगाथा, भास्कर भोसले लिखित मेघळा या पुस्तकांचे यावेळी मान्यवरच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या सभामंडपात संमेलनाच्या दोन्ही दिवशी २६० कवींनी आपल्या कविता सादर केले. या खुल्या कवी संमेलनात प्रेमापासून ते विद्रोहापर्यंत सर्वच प्रकारच्या कवितांनी हे सभामंडप बहरून गेला. महाराष्ट्रासह बेळगाव, धारवाड, निपाणी, बीदर, कारवार, भालकी, खानापूर, गोवा, दिल्ली, हैदराबाद, गुजरात, मध्यप्रदेश या भागातून आलेल्या २५ हून अधिक कवींनी सहभाग नोंदवला. कविता सादरीकरणामध्ये प्रामुख्याने विक्रम मालन आप्पासो शिंदे, रमेश रेडेकर, प्रा. नितीन नाळे, जयश्री तेरकर, मीना महामुनी, बाळासाहेब गिरी, जितेंद्र सोनवणे, प्रतिभा मगर, कृष्णा साळुंखे, युसूफ सय्यद आणि बेळगाव येथून आलेले रवींद्र पाटील यांच्यासह २६० कवींनी सहभाग नोंदवला.
याशिवाय कथाकथन, चर्चासत्र, एकपात्री नाटक, मराठी भावगीते, भारुड, गौळण अशा विविध मराठी साहित्य प्रकारांचे सादरीकरण ही या मंडपात झाले.

या सभामंडपाला सकाळचे संपादक सम्राट फडणीस, साहित्य अकादमी विजेत्या साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप आवटे, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोळक, बालभारतीच्या किशोर या मासिकाचे मुख्य संपादक किरण इंदू केंद्रे, गीतकार प्रांजल बर्वे, लोकमतचे मुख्य संपादक संजय आवटे, ॲड. नर्सिंग जाधव, टीव्ही 9 चे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव, साम टीव्हीचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये, राजेंद्र वाघ, रवींद्र कोकरे आदींनी या सभामंडपात विचारपीठाला भेट देऊन सर्व कवींशी संवाद साधला.
या कविसंमेलनाचे आयोजन अमोल कुंभार, सुनील साबळे, महादेव आबनावे, अजिंक्य बनसोडे, अभय जगताप, आदर्श विभुते, गणेश दिवेकर, समीर बुधाटे, तानाजी गायकवाड, बाळासाहेब केमकर, सुरज शिंदे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31 ° C
31 °
31 °
61 %
6.5kmh
99 %
Tue
30 °
Wed
36 °
Thu
29 °
Fri
38 °
Sat
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!