भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे:
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘लक्ष्य ‘हा नृत्य कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे.ज्येष्ठ ओडिसी नृत्य प्रशिक्षक झेलम परांजपे (मुंबई) या ओडीसी नृत्य सादर करणार आहेत ,धनश्री नातू-पोतदार (पुणे) या कथक नृत्य सादर करणार आहेत ,सागरिका पटवर्धन(पुणे) या भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत.हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था,पुणे प्रस्तुत करणार आहे.शनीवार,दि.१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३५ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.
…………………………………………