16.1 C
New Delhi
Friday, November 28, 2025
Homeमहाराष्ट्रअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोंढवा शाखेची दिमाखदार सुरवात

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोंढवा शाखेची दिमाखदार सुरवात

पुणे- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आपला विस्तार वाढवताना कोंढवा भागात ब्राह्मण समाजाला एकत्रित संघटित करण्यासाठी या भागात शाखेचे स्थापना व पूर्व कार्यकारिणी समिती स्थापन केली.
कोंढव्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांची वस्ती असलेल्या भागात, प्रतिकूल परिस्थितीत ब्राह्मण समाजाला एकत्र एका शाखेअंतर्गत आणणे एक आव्हानात्मक टास्क होते. जे आजच्या बैठकीनंतर पुर्ण झाले असे म्हणता येईल.

स्थानिक रहिवासी व आपले सभासद असलेल्या श्री बजरंग जीं देशपांडे यांच्या विशेष प्रयत्नांनातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या भागातील अनेक सन्माननीय व प्रतिष्ठित, सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या अनेक ब्राह्मण लोकांनी यात सहभाग नोंदवला व समाजाच्या प्रगतीसाठीचे आपले विचार मांडले व ब्राह्मण समाजाला संघटित करून एक उत्तम शाखा या भागात तयार करण्याचा मानस सगळ्यांनी व्यक्त केला व त्यासाठी प्रत्येकी किमान दहा ब्राह्मण सभासद पुढील बैठकीसाठी जोडण्याचे आव्हान स्वीकारले.

महिलांचा व जेष्ठ नागरिकांचा उत्साह, प्रगल्भ विचार यांनी कोंढव्या सारख्या भागात पुढील काही दिवसात एक मोठी शाखा नावारूपास येईल याची खात्री झाली.

आजच्या बैठकीत येत्या रामनवमीला एक मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मंदार रेडे यांनी ABBM चे ध्येय, उद्दिष्टे तसेच भारतभर सुरू असलेले ब्राह्मण समाजासाठीचे कार्य व समाजापरी असलेले आपले कर्तव्य, योगदान याची माहिती दिली व उपस्थितांच्या मनातील प्रश्नांचे निरसन केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याचे प्रगतीच्या दृष्टीने पडलेले पुढचे पाऊल, जय परशुराम🚩

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
72 %
0kmh
0 %
Thu
21 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!