26.1 C
New Delhi
Wednesday, March 12, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञान'टाटा'ने रचला इतिहास

‘टाटा’ने रचला इतिहास


मुंबई – भारताचे सर्वात मोठे चार चाकी उत्पादक आणि भारतातील ईव्ही क्रांतीचे प्रणेते टाटा.ईव्ही यांनी काश्मीर ते कन्याकुमारीचे अंतर अवघ्या ७६ तास आणि ३५ मिनिटांत कापून सर्वात जलद ईव्ही ड्राइव्हचा विक्रम नोंदला. यापूर्वीच्या नेक्सोन ईव्ही मॅक्सच्या विक्रमापेक्षा तब्बल १९ तासांहून कमी वेळात प्रवास पूर्ण करण्यात आला. ड्राइव्हचे नेतृत्त्व त्यांच्या एसयूव्ही कूप कर्व्‌‍ह.ईव्हीने केले. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे ३८०० किमी.चे अंतर सर्वात जलद पार करण्याबरोबरच कर्व्‌‍ह.ईव्हीने यशस्वीरित्या २० राष्ट्रीय विक्रम देखील स्थापित केले.
हा लक्षणीय प्रवास पूर्ण करताना कर्व्‌‍ह.ईव्हीने फक्त १६ चार्जिंग स्टॉप घेतले. यावेळी चार्जिंगची सरासरी वेळ २८ तासांच्या ऐवजी कमी होऊन १७ तास झाली. यामधून बॅटरी टेक्नॉलॉजीची प्रगती दिसून येते तसेच देशभरात सार्वजनिक चार्जिंग नेटवर्क पसरले असल्याची ग्वाही देखील मिळते. या चार्जिंग नेटवर्कमधील महामार्गालगतचे बहुतांशी चार्जिंग पॉइंट आता जलद चार्जिंग स्पीडचे समर्थन करणारे आहेत.
कर्व्‌‍ह.ईव्हीच्या प्रवासाची यथासांग सुरुवात श्रीनगर येथे जम्मू आणि काश्मीरचे माननीय मुख्य मंत्री श्री. ओमर अब्दुल्ला यांनी दिलेल्या फ्लॅग ऑफने झाली. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ४ वाजता हा प्रवास सुरू झाला. टाटा.ईव्हीचे प्रमुख उत्पादन असलेल्या या ईव्ही ने विविध प्रकारच्या हवामान स्थितीतून वाट काढत, विविध प्रकारच्या प्रांतांतून आणि भारतातील सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कच्या मदतीने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८:३५ वाजता कन्याकुमारीचे गंतव्य स्थान गाठले. कन्याकुमारीतील खासदार विजय वसंत यांनी कन्याकुमारीत या विक्रमी राईडचे स्वागत केले.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, ”मोठे प्रवास देखील ईव्ही च्या सोबतीने किती सहज, सक्षमतेने आणि आरामदायक पद्धतीने होऊ शकतात हे दाखवण्यासाठी आम्ही हा रोमांचक नॉन-स्टॉप प्रवास योजला होता. दररोज अंदाजे १२०० किमी. अंतर कापण्याच्या इराद्याने, नावीन्यपूर्ण एक्टि.ईव्ही प्योर ईव्ही आर्किटेक्चर आणि ५५ केडब्ल्यूएच बॅटरीने सुसज्ज अशा कर्व्‌‍ह.ईव्हीने हे टिकाऊपणाचे आव्हान सहज पेलले आणि चालकांना थकवा-मुक्त अनुभव दिला. सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता १८००० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्‌‍स आहेत. या विक्रमी प्रवासात कर्व्‌‍ह.ईव्ही ज्या १० राज्यांतून आणि केंद्रशासित प्रदेशातून पसार झाली, त्यातील प्रत्येक जिल्हा फास्ट चार्जर्सनी सळसळला होता. या व्यतिरिक्त, झपाट्याने वाढत चाललेल्या हाय-स्पीड चार्जिंग नेटवर्क आणि स्मूद महामार्गांचा देखील कर्व्‌‍ह.ईव्ही च्या राईडला फायदा झाला. या लक्षणीय सिद्धीमधून हे सिद्ध झाले की, टाटा ईव्ही एखाद्या आयसीई-संचालित वाहनापेक्षा उणी नाही आणि इतका मोठा प्रवास देखील ही गाडी यशस्वीरित्या पूर्ण करू शकते. आम्हाला विश्वास आहे की, कर्व्‌‍ह.ईव्हीची ही उत्कृष्ट कामगिरी संभाव्य ग्राहकांमध्ये ईव्ही खरेदी करून शून्य उत्सर्जन करणारी गतिशीलता अंगिकारण्याबाबतचा विश्वास वाढवेल आणि त्याच बरोबर ईव्ही मालकांना गर्वाची अनुभूती देईल.”
भारताच्या ईव्ही गाथेत तडफदार प्रगती:
१) या आधीच्या रेकॉर्ड रन नंतरच्या काळात भारताच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप सुधारणा झाली आहे. २०२३ मध्ये नेक्सोन.ईव्ही साठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची मोजणी करताना सर्वात इष्टतम मार्ग ४००४ किमी. चा होता. यावेळेच्या विक्रमी राईडमध्ये कर्व्‌‍ह.ईव्हीसाठी हे अंतर कमी होऊन ३८२३ किमी. झाले होते कारण चार्जर शोधण्यासाठी फारशी आडवाट करण्याची वेळ आली नाही. चार्जर्सच्या वाढलेल्या संख्येमुळे आयसीई आणि ईव्ही यांना इष्टतम अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेतला फरक बराच कमी झाला आहे. त्यामुळे लांबवरचे प्रवास ईव्ही साठी जवळजवळ तितकेच सोपे झाले आहेत.
२) वर्तमान १८,००० चार्जर्स सह, भारताच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये २०२३च्या तुलनेत २२७ म सुधारणा झाली आहे. विशेषत: जलद हाय-पॉवर्ड ६०- १२० केडब्ल्यू चार्जर्स सामील झाले आहेत.
३) देशभरात ८५म महामार्गांवर दर ५० किमी. वर एक फास्ट चार्जर आहे.
४) आयआरए.ईव्ही ॲपच्या चार्ज पॉइंट ॲग्रिगेटर द्वारा ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक चांगला बनवण्यात आला आहे. हे ॲप १२,००० पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्‌‍सना मॅप करते आणि कुशल रूट प्लॅनिंग बरोबरच वाहनाची माहिती देखील देते. या व्यतिरिक्त, .ईव्ही व्हेरिफाईड चार्जर प्रोग्राममुळे दूरवरचे प्रवास पाहिल्यापेक्षा जास्त पूर्वानुमानित झाले आहेत. हा प्रोग्राम विश्वसनीय चार्जिंग, मूलभूत सुविधांची उपलब्धता आणि मोक्याच्या स्थानाच्या आधारे प्रत्येक चार्जरचे रेटिंग करतो.
५) टाटा.ईव्ही युनिफाईड आरएफआयडी कार्डने ईव्ही मध्ये चार्जिंग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या सीपीओसमधून वेगवेगळ्या ॲप्लिकेशन ॲक्सेस करण्यासाठी इंटरनेटवर विसंबून न राहता, सोय वाढवली आहे.
कर्व्‌‍ह.ईव्हीचा यशस्वी के२के रन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वर्धित रेंज प्रदान करून भारताच्या ईव्ही ईकोसिस्टमला पुढे नेण्याबाबत टाटा.ईव्हीच्या वचनबद्धतेस बळकट करतो. भारताची पहिली एसयूव्ही कूप तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरकडे किंवा टाटा.ईव्ही स्टोअर मध्ये १७.४९ लाख रु. पासून सुरू होणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
44 %
2.1kmh
20 %
Wed
30 °
Thu
36 °
Fri
35 °
Sat
35 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!