32.1 C
New Delhi
Saturday, April 19, 2025
Homeताज्या बातम्यामालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’….

मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’….

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या 14 मालमत्ता केल्या जप्त…

पिंपरी,- : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ही जप्ती मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होत आहेत. गुरुवार (20 मार्च) रोजी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी थेट महानगरपालिका कार्यक्षेत्रात चिखली, तळवडे, आकुर्डी, वाकड झोनमधील मिश्र, बिगनिवासी, व्यावसायिक थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या असून निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडणीची कारवाई करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत मालमत्ता कर आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आहे. वारंवार आवाहन करून देखील जे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांना नोटीस देण्यात येत आहेत. त्यानंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या आता थेट मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी मालमत्ता कर विभागाची प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात पथके कार्यरत करण्यात आली आहे. त्यातच आता आर्थिक वर्ष 2023-24 संपण्यासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्यामुळे आता थेट जप्ती कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ऑन ग्राऊंड दिसू लागले आहेत.

गुरुवारी चिखली येथील श्री. संदीप प्रकाश मोरे यांच्या मिश्र मालमत्तेकडे 23,49,508 लाख रुपयांची थकबाकी असल्याने मालमत्ता जप्तीची व नळ कनेक्शन तोडणीची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर, तळवडे येथील भालेकर नवनाथ तुकाराम व इतर यांच्या इंडिया टूल्स या
औद्योगिक मालमत्तेकडील 20 लाख 64 हजार रुपयांच्या थकीत रकमेपोटी मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली. याचबरोबर, बेळळे माधव नागप्पा यांच्या मिश्र मालमत्तेकडील 16 लाख 93 हजार 597 इतक्या रक्कमपोटी, आकुर्डी येथील मे. हॉटेल पन्हाळगड तर्फे विवेक सोपान काळभोर/गोपाळ धों. काळभोर व इतर 2 यांच्याकडील 28,37,203 इतक्या थकीत रकमेपोटी,
हॉटेल शेतकरी मळा तर्फे अनिकेत भगवान काळभोर यांच्या 23,38,522 इतक्या थकीत रकमेपोटी,
मे. हॉटेल कबाबकरी तर्फे ओंकार अरुण काळभोर यांच्या 10,75,404 इतक्या थकीत रकमेपोटी तर मे. शेतकरी मळा मिसळ हाऊस तर्फे अजिंक्य भगवान काळभोर यांच्या 1,89,846 इतक्या थकीत रकमेपोटी तर वाकड येथील धनाजी रामभाऊ विनोदे यांचे हॉटेल अजिंक्य यांच्याकडील 14,44,902 इतक्या थकीत रकमेपोटी मालमत्ता जप्तीची कारवाई करून मालमत्ता सील करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, सहाय्यक मंडलाधिकारी, गटप्रमुख आदींच्या उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली.


आता रोज 10 मालमत्ता अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत होणार जप्तीची कारवाई !

आर्थिक वर्ष संपायला अवघे 12 दिवस बाकी असल्याने आता 5 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या रोज 10 मालमत्तावर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले आहे.


862 कोटींची झाली वसुली, जप्तीची मोहिम होणार तीव्र

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत 862 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिले असून त्या अनुषंगाने कर वसुलीची मोहीम अधिकच व्यापक स्वरुपात राबवली जात आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुट्टी (शनिवार, रविवार) आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालय सुरू राहणार आहे.


मालमत्ता जप्तीची कारवाई अजून कठोर होणार!!!

शहरातील बिगरनिवासी, मिश्र, व्यावसायिक मालमत्तांच्या थकबाकीदारांना थकीत कर भरण्याचे आवाहन करण्यात येत असून अद्यापही बऱ्याचशा मालमत्ताधारकांनी अद्यापही थकीत कराचा भरणा केलेला नाही. येत्या 12 दिवसांमध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई कठोर होणार असून कोणत्याही थकबाकीदारांच्या शंभर टक्के मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. नागरिकांनी तात्काळ आपल्या थकीत कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी.

  • प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (1), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

31 मार्चपूर्वी थकीत कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी!

शहरातील थकबाकीदारांना थकीट कराचा भरणा करण्यासाठी विविध माध्यमातून वारंवार आवाहन करण्यात आले. थकबाकीदारांना यापूर्वीच जप्तीची नोटीस सुद्धा बजाविण्यात येऊन जप्तीची अधिपत्रसुद्धा काढण्यात आले आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्तेवर जप्तीची पूर्वसूचना देऊनही मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असून गुरुवारी अतिरिक्त आयुक्त यांनी समक्ष भेट देऊन केलेल्या कारवाई प्रमाणे येत्या काहींदिवसात सुद्धा अशाचप्रकारे मालमत्ता जप्तीची कारवाई मोहीम राबविण्यात येणार असून थकबाकीदारांनी आपल्या थकीत कराचा तात्काळ भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी.

  • अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.1 ° C
32.1 °
32.1 °
37 %
4.3kmh
0 %
Sat
41 °
Sun
41 °
Mon
40 °
Tue
41 °
Wed
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!