37.3 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएचडीएफसी कॅपिटल ने टोटल इनव्हायर्नमेंटमध्ये केली ₹ १,३०० कोटींची गुंतवणूक

एचडीएफसी कॅपिटल ने टोटल इनव्हायर्नमेंटमध्ये केली ₹ १,३०० कोटींची गुंतवणूक

पुणे – : बंगळूर येथे उच्च गुणवत्तेच्या घरांच्या विकासार्थ १३०० कोटी रु. चा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी एचडीएफसी कॅपिटल या एचडीएफसी समूहाच्या रियल इस्टेट प्रायव्हेट इक्विटी शाखेने टोटल इनव्हायर्नमेंटशी भागीदारी केली. टोटल इनव्हायर्नमेंट हा दक्षिण भारतातील एक आघाडीचा रियल इस्टेट विकासक आहे.या धोरणात्मक भागीदारीमुळे टोटल इनव्हायर्नमेंटद्वारे सध्या विकसित करण्यात येत असलेल्या १६ मिलियन चौरस फुट क्षेत्राच्या निवासी प्रकल्पांमध्ये ६.५ मिलियन चौरस फुट नवीन निवासी प्रकल्पांची भर पडेल. या नवीन निवासी प्रकल्पांचे एकत्रित एकूण विकास मूल्य (जीडीव्ही) १०,१०० कोटी रु. असेल आणि हे प्रकल्प येत्या चार ते पाच वर्षांत पूर्ण करण्यात येतील.

ही भागीदारी शाश्वत, ग्रीनफील्ड निवासी प्रकल्प विकसित करेल जे शहराच्या रहिवाशांना राहण्याच्या दर्जेदार जागा प्रदान करून शहराचे गृहनिर्माण क्षेत्र अधिक सुंदर बनवेल.

सदर घडामोडीविषयी टिप्पणी करताना एचडीएफसी कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल रुंगटा म्हणाले, एक उत्तम ट्रॅक रेकॉर्ड असेलेल्या, विश्वासार्ह रियल इस्टेट विकासकाशी असलेली आमची भागीदारी मजबूत करण्याबाबत एचडीएफसी कॅपिटल वचनबद्ध आहे. टोटल इनव्हायर्नमेंटशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे, भारतातील मध्यम-उत्पन्नाच्या आणि त्याच्यापेक्षा वरील स्तराच्या कुटुंबांसाठीच्या शाश्वत आणि दर्जेदार घरांची मोठी मागणी पूर्ण करायला मदत होईल.

टोटल इनव्हायर्नमेंटचे संस्थापक कमल सागर यांनी या भागीदारीविषयी आपले मत व्यक्त करताना म्हटले, एचडीएफसी कॅपिटलशी असलेली आमची पूर्वीपासूनची भागीदारी सुदृढ करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीतून आम्हाला मोठ्या, दिमाखदार निवासी समुदायांना निधी देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी दीर्घकालीन आणि लवचिक भांडवल उपलब्ध होईल तसेच या गुंतवणुकीमधून आमच्या काही सुरू असलेल्या प्रकल्पांमध्येही गुंतवणूक होणार आहे, जेणेकरून आम्ही ते प्रकल्प जलद गतीने पूर्ण करू शकू. देखभाल आणि कारागिरी यांच्या माध्यामातून आमची उत्पादने आणि सेवा सतत सुधारण्याच्या आमच्या मिशनला देखील या भागीदारीमुळे चालना मिळेल.

हा प्लॅटफॉर्म एचडीएफसी कॅपिटलने टोटल इनव्हायर्नमेंटमध्ये केलेली चौथी गुंतवणूक दर्शवितो आणि त्या अनुषंगाने टॉप-रेटेड विकासकांशी भागीदारी करण्याच्या त्यांच्या धोरणावर प्रकाश टाकतो. सध्याच्या तीन गुंतवणुकींपैकी दोन यशस्वी ठरल्या असल्याने सर्व हितधारकांसाठी लक्षणीय मूल्य निर्मिती झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
37.3 ° C
37.3 °
37.3 °
52 %
1.2kmh
82 %
Fri
37 °
Sat
42 °
Sun
39 °
Mon
32 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!