27.6 C
New Delhi
Wednesday, July 16, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानग्लोबल एजुकेशन फेअर 2025 ला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्लोबल एजुकेशन फेअर 2025 ला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी स्मार्टच्या वतीने ग्लोबल एजुकेशन फेअर (global education fair ) 2025 चे आयोजन करण्यात आले होते.  या फेअर ला पुण्यातील विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एज्युकेशन फेअर मध्ये एक हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते तर युरोप, अमेरिका सह  ऑस्ट्रेलिया मधील विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. 

हा फेअर पुण्याच्या ‘पोचा हॉल’, बोट क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल एज्युकेशन फेअर 2025 बद्दल माहिती देताना  स्टडी स्मार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर, चेतन जैन यांनी सांगितले की,  “आजकाल अनेक विद्यार्थी 12वी किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतर विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन, माहिती आणि तज्ञांचा सल्ला न मिळाल्यामुळे ते या मार्गात अडचणींचा सामना करतात.

या फेअरमध्ये जगभरातील 50 हून अधिक नामांकित विश्वविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.  यामध्ये यूके, यूएसए, आयर्लंड, जर्मनी, दुबई आणि इतर देशांतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था समाविष्ट आहेत. विद्यार्थी या प्रतिनिधींशी थेट संवाद साधू शकतात, योग्य अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, करिअरचे मार्गदर्शन, आणि विविध महत्त्वाच्या संधींबद्दल माहिती देण्यात आली. 

याशिवाय, फेअरमध्ये विविध इंटरएक्टिव्ह कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना छात्रवृत्त्या आणि आर्थिक सहाय्य, सप्टेंबर 2025 मध्ये प्रवेशासाठी संधी, स्पॉट ऑफर आणि IELTS  सूट, पोस्ट-स्टडी काम आणि करिअर संधींविषयी पूर्णपणे मोफत मार्गदर्शन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.6 ° C
27.6 °
27.6 °
75 %
3.7kmh
100 %
Wed
35 °
Thu
32 °
Fri
35 °
Sat
36 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!