14.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्र‘संविधानातील राम’ आधुनिक युगात रामाचा खरा अर्थ- ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर

‘संविधानातील राम’ आधुनिक युगात रामाचा खरा अर्थ- ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर

एमआयटी डब्ल्यूपीयूत आयोजित कार्यक्रमात ‘भारतीय भाषेतील रामकथा’ व ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे, : ” संविधानात राम, श्री राम जय राम जय जय राम हे आधुनिक युगात रामचा खरा अर्थ सांगणारे वाक्य आहे. प्रत्येकाच्या जीवनात आरंभा पासून ते अंतापर्यंत श्री राम रूजलेला आहे. राम हेच जीवनाचे विश्व आहे. या नावातच मोठी महिमा आणि गोडवा आहे.” असे विचार ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या विद्यमाने ख्यातनाम लेखक, गांधी जीवन साहित्य व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘भारतीय भाषेतील रामकथा’ आणि ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे हे सन्माननीय विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच लेखक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
विजय बाविस्कर म्हणाले,”आधुनिक काळात लहान मुलांच्या जीवनावर होणार्‍या दुष्पपरिणामाकडे पाहता यावर भाष्य करणार्‍या रामाचे नवे स्वरूप पुढे आहे. नुकतेच रामनवमीच्या निमित्ताने लहान मुलांच्या चुमने रामाचा अर्थ सांगतांना असे मांडले की अभ्यासात जो रमतो राम, ग्राउंडवर जो गाळतो घाम श्रीराम जय राम जय जय राम… पत्रकार हा समाजाचा घटक असल्याने त्यांनी आधुनिक युगात सकारात्मक पत्रकारिता करावी.”
“संपादक, पत्रकार यांना धावपळिच्या युगात बोलावून मनःशांतीचे धडे दिल्यास निश्चितच समाजात खूप मोठे बदल घडतील. ९० पुस्तकांची निर्मिती करणारे लेखक विश्वास पाटील यांनी आता महात्मा गांधी आणि राम यावर नव्या पुस्तकाचे लेखन करावे असे ही विजय बाविस्कर यांनी सांगितले. ”
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” भारतीय संस्कृतीचे खरे तत्वज्ञान आणि परंपरेचे मूर्तीमंत प्रतिक श्री राम आहे. राम हा मार्यादा पुरूषोत्तम व एक वचनी आहे. मानव कल्याणासाठी रामाच्या जीवनाने जी चौकट आखली आहे ते सर्वोत्तम आहे. येणार्‍या काळात भारतीय तत्वज्ञान जगला दिशा देण्याचे कार्य करेल. यातूनच विश्वशांती निर्माण होईल.”
अरूण खोरे म्हणाले,” वर्तमान काळात आजच्या राजकर्त्यांंच्या अंतःकरणात खरा राम जागृत होने गरजेचे आहे. परंपरेतील सत्व तसेच ठेऊन नवे विचार काढले पाहिजे. पुस्तकाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा चांगला विचार समोर आला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने राम, गांधीजी आणि विनोबा हे एक सूत्र आहे हे समझले. प्रत्येकाच्या आयुष्यात रामाचे सत्व सापडायला हवे. भारतीय भाषेतील रामकथा, तुलसी रामायणाची भूमिका लेखकानी वेगळ्या प्रकारे मांडली आहे.”
प्राचार्य डॉ. विश्वास पाटील म्हणाले,” राम हे वैश्विक संस्कृतीचे रूप आहे. वाल्मिकी, कालिदास आणि तुलशीदास यांनी रामायण सांगितले. तसेच राम आणि कृष्ण हे जगाच्या संदर्भात पुजनीय आहेत. अहिल्याचा उद्धार झाल्यावर रामराज्याची स्थापना गंगेच्या काठेवर झाली. तसेच राम कथेची पहिली श्रोता ही जगदंबा आहे.”
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागतपर भाषण डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले.
डॉ. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निलवर्ण यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
14.1 ° C
14.1 °
14.1 °
82 %
3.1kmh
39 %
Wed
27 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!