पुणे : कै. सुनिल भंडारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त, चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्था, पुणे आणि रेड स्वस्तिक सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य व रोगनिदान शिबिर (Free health camp) आयोजित करण्यात आले. या एकदिवसीय उपक्रमात 2000 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
हे शिबिर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत भव्य स्वरूपात पार पडले. शिबिराच्या (Maha Arogya Shibir Pune) माध्यमातून विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, निदान व प्राथमिक उपचार करण्यात आले.
प्रमुख आरोग्य सेवा व निष्कर्ष:
- डोळ्यांची तपासणी करून 700 गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप (Eye checkup and free spectacles Pune)करण्यात आले.
- 85 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच मोफत करण्यात येणार आहे.
- स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) निदान झालेल्या महिलांवर विशेष उपचार करण्यात येणार आहेत.
- 215 रुग्णांची हृदय तपासणी करण्यात आली, यापैकी 40 जणांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.
- रक्तदान शिबिरात 165 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. त्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
- मणका (स्पाईन), मेंदू, कॅन्सर, स्त्रीरोग आणि अर्धांगवायू यांसारख्या गंभीर आजारांवर सुद्धा तज्ज्ञांकडून मोफत सल्ला व प्राथमिक उपचार करण्यात आले.
वैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग:
या शिबिरात डॉ. संजय तरलेकर, डॉ. स्मिता वाबळे, डॉ. गुरुतेजसिंग ब्रार (कॅनडा), डॉ. सुनील साबळे यांसारख्या नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांनी सहभाग घेऊन रुग्णांची तपासणी केली.
मान्यवरांची उपस्थिती:
शिबिराला सीआयडीचे डीआयजी सारंग आव्हाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक सनी निम्हण, बाळासाहेब बोडके, उदय महाले, प्राचार्य वाल्हेर, प्रसाद भिमाले आणि तिरुपती भंडारी आदी मान्यवरांनी भेट देऊन या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.
आयोजकांची प्रतिक्रिया:
या उपक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आल्याचे चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मारुती भंडारी आणि रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य सचिव अशोक शिंदे यांनी सांगितले. “आजार आणि आर्थिक परिस्थिती यामधील दरी मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी नमूद केले.