32.1 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएमएनजीएलने “My MNGL” अ‍ॅप लाँच केले — ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि गॅस सेवा...

एमएनजीएलने “My MNGL” अ‍ॅप लाँच केले — ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि गॅस सेवा सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे, – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने आपला अधिकृत मोबाइल अ‍ॅप “My MNGL” लाँच केला आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासह सर्व गॅस सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जातील.

अलीकडील काळात MNGLच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात असून, त्यावर आळा घालण्यासाठी हा अ‍ॅप एक सुरक्षित, अधिकृत आणि वापरण्यास सुलभ असा उपाय ठरणार आहे.

फसवणुकीच्या घटना थांबाव्यात म्हणून MNGLने याआधी खालीलप्रमाणे विविध उपाययोजना केल्या:

आघाडीच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जनजागृतीसाठी सूचना प्रसिद्ध केल्या

SMS आणि WhatsApp मोहिमा राबवल्या

सोशल मीडियावर (Instagram, Facebook, X) फसवणूक अलर्ट्स शेअर केले

रेडिओ जिंगल्सद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला

पुणे पोलिस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली

तरीही, काही ग्राहक फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे MNGLने आपली जनजागृती अधिक तीव्र करत, “My MNGL” नावाचा एक पूर्णतः सुरक्षित आणि विश्वासार्ह अ‍ॅप ग्राहकांच्या सेवेत आणला आहे.

MNGLचे बिलिंग विभाग प्रमुख अनंत जैन म्हणाले, “ग्राहकांना सातत्याने फसवणूक करणाऱ्या कॉल्स व मेसेजेसचा त्रास सहन करावा लागत आहे, हे अतिशय दु:खद आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ‘My MNGL App’ लाँच केला आहे, जेणेकरून ग्राहक कोणत्याही जोखमीशिवाय आपले गॅस खाते डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे हाताळू शकतील.”

My MNGL अ‍ॅपच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे:

MNGL शी संबंधित सर्व सेवा एका ठिकाणी

अधिकृत व खात्रीशीर माहिती आणि संप्रेषण

फसवणुकीपासून सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहार

MNGLकडून सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, फक्त अधिकृत अ‍ॅप स्टोअरवरूनच “My MNGL” अ‍ॅप डाउनलोड करा, आणि कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नका.

“My MNGL” अ‍ॅप आजच डाउनलोड करा आणि तुमच्या गॅस सेवांवर सुरक्षितपणे नियंत्रण मिळवा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.1 ° C
32.1 °
32.1 °
53 %
4kmh
91 %
Sat
32 °
Sun
38 °
Mon
33 °
Tue
36 °
Wed
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!