30.8 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeआरोग्यडॉ. वर्षा तुळसे यांना इंग्लंडमध्ये 'प्रॅक्टिस ऑफ द इयर' पुरस्कार: भारतीय दंतरोग...

डॉ. वर्षा तुळसे यांना इंग्लंडमध्ये ‘प्रॅक्टिस ऑफ द इयर’ पुरस्कार: भारतीय दंतरोग तज्ञांचा ऐतिहासिक मान!”

पिंपरी, – पिंपरी चिंचवडमधील रहिवासी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदा तुळसे व लक्ष्मण तुळसे यांची कन्या, डॉ. वर्षा तुळसे (खिराडे) यांना इंग्लंडमध्ये ‘द प्रॅक्टिस ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. डॉ. वर्षा तुळसे, ब्रूक लेन डेंटल सर्जरी,(Dr. Varsha Tulse Dental Excellence) फेलिक्सस्टोव्ह, लंडन येथील संचालिका, या पुरस्काराच्या मानकरी बनल्या आहेत. त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉकलँड एक्सएल, लंडन येथे इंग्लंडचे मुख्य दंत अधिकारी जेसन वाँग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

‘द प्रॅक्टिस ऑफ द इयर’ पुरस्कार

हा पुरस्कार इंग्लंडमधील वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या डॉक्टरांना दिला जातो. डॉ. वर्षा तुळसे यांना हा पुरस्कार मिळवणारी एकमेव भारतीय डॉक्टर आहेत. ‘DCby1’ या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या डॉक्टरांना हे पुरस्कार दिले जातात. डॉ. तुळसे या उपक्रमाच्या अंतर्गत दोन वर्षांपर्यंतच्या बाळांची दातांची(Top Dentist in India) निगा राखण्यासाठी सामाजिक जनजागृती करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.

यावेळी, एनएएसडीएएल चे प्रमुख हैदी मार्शल, बीएसपीडीचे अध्यक्ष शन्नू भाटिया, डॉ. किरण तुळसे, आणि व्यवस्थापक चंद्रकांत खिराडे आदी उपस्थित होते. या पुरस्काराने डॉ. तुळसे यांच्या कार्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व अधोरेखित केले आहे.

सामाजिक कार्य आणि मार्गदर्शन

डॉ. तुळसे यांना २०१७ मध्ये इंग्लंड संसदेचे अध्यक्ष जॉन बर्को यांच्या हस्ते ‘डेंटल टीचिंग पुरस्कार’ मिळाल्याचेही विशेष मानले जाते. लंडनमधील ‘सफॉक साउंड’ या टॉक शोमध्ये महिन्यातून एकदा दंत रोगाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते नियमितपणे सहभागी होतात. या टॉक शोचे सूत्रसंचालन लंडनचे माजी महापौर मार्क जेप्सन करतात.

शिक्षण आणि दंत उपचार क्षेत्रातील कार्य

डॉ. तुळसे यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी चिंचवडमधील जय हिंद हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर, त्यांनी नाशिक येथून दंत चिकित्सा शास्त्रात शिक्षण घेतले आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी विविध कोर्सेस पूर्ण केले. बीडीएस पदवी घेतल्यानंतर त्यांनी पिंपरी येथे डॉ. मोहन पानसे यांच्या सोबत प्रॅक्टिस केली. नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये एमजेडीएफ (आरसीएस), ओआरइ (जीडीसी युके) आणि पीजी डेंटल एज्युकेशन पूर्ण केले.

उपक्रम आणि प्रोत्साहन

ब्रुक लेन डेंटल सर्जरीमध्ये डॉ. तुळसे आणि त्यांच्या टीमने ‘टूथ फेयरी डे’ अंतर्गत २ वर्षांपर्यंतच्या बाळांसाठी दंतरोग तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. यामध्ये पालकांना दातांच्या निरोगीतेसाठी योग्य अन्नपदार्थ आणि नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. लहान बाळांमध्ये दात तपासणी करणे एक आनंददायक अनुभव बनविण्यासाठी टीम कार्यरत आहे.

याशिवाय, ‘चिल्ड्रन्स ओपन डेज’ या उपक्रमाद्वारे मुलांना मजेदार पद्धतीने दात तपासणी केली जाते. डॉ. तुळसे यांच्या कार्यामुळे त्यांचा आवाज दंतरोग क्षेत्रातील अनेकांना ऐकू गेला आहे आणि त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.8 ° C
30.8 °
30.8 °
68 %
1.7kmh
100 %
Sat
38 °
Sun
37 °
Mon
30 °
Tue
34 °
Wed
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!