26.4 C
New Delhi
Wednesday, June 18, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

भाजपकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

बळींना श्रद्धांजली, दहशतवादविरोधात कटिबद्धता व्यक्त

पिंपरी–
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या झालेल्या हत्येचा तीव्र निषेध करत भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्यावतीने शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन मोरवाडी येथील भाजपा कार्यालयात करण्यात आले.

हल्ल्यात बळी गेलेल्या हिंदू नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

“हल्लेखोरांनी निवडकपणे हिंदू पर्यटकांना लक्ष्य करत केलेल्या या भ्याड कृत्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारकडून दोषींवर कठोर कारवाई होईल आणि देश विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या श्रद्धांजली सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस नामदेव ढाके, तसेच विविध मोर्चांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकत्र येत “दहशतवादाचा निषेध” करत देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.

उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये अजय पाताडे, शीतल शिंदे, अनुप मोरे, तेजस्विनी कदम, सुजाता पालांडे, मोहन राऊत, सागर देसाई, आरती सोनावणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
52 %
3.2kmh
80 %
Wed
36 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
37 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!