मुंबई, – भारतीय क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मानंतर आता विराट कोहली(KingKohli)नेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे भारतीय संघात मोठा बदल अपेक्षित आहे.
कसोटीपासून निवृत्त होत असले तरी विराट आणि रोहित दोघेही IPL मध्ये आपली झुंजार कामगिरी सुरू ठेवणार आहेत.
दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाल्यामुळे IPL 2025 स्थगित करण्यात आला आहे. ८ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धाच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
🏏 कसोटीमधील कोहली आणि रोहित – आकड्यांत झळकलेले यश
🧢 विराट कोहली:
- सामने: १२३
- धावा: ९२३०
- सरासरी: ४६.८५
- शतके: ३०
- अर्धशतके: ३१
- सर्वोत्तम खेळी: नाबाद २५४
🧢 रोहित शर्मा:
- सामने: ६७
- धावा: ४३०१
- सरासरी: ४०.५७
- शतके: १२
- अर्धशतके: १८
- सर्वोत्तम खेळी: २१२
- गोलंदाजी: २ बळी
