25 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeताज्या बातम्या'सावली’ निवारा केंद्र ठरले राज्यात अव्वल! पिंपरी चिंचवड पालिकेचा अभिमान

‘सावली’ निवारा केंद्र ठरले राज्यात अव्वल! पिंपरी चिंचवड पालिकेचा अभिमान

sawali-nivara-kendra – पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०२० साली सुरू केलेले ‘सावली’ बेघर निवारा केंद्र आता राज्यभरात आदर्श ठरत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सुरू केलेल्या या केंद्राने राज्यातील सर्वोत्कृष्ट निवारा केंद्र म्हणून गौरव मिळवला आहे. राज्य शासनाच्या निवारा सनियंत्रण समितीच्या निरीक्षणानंतर ही गौरवाची निवड करण्यात आली आहे.

🔹 राज्यस्तरीय गौरवप्राप्ती

राज्यातील विविध महापालिका व नगरपरिषदांच्या निवारा केंद्रांचे त्रयस्थ संस्थेद्वारे परीक्षण करण्यात आले. यामध्ये त्रिशरण एनलायनमेंट फाउंडेशन संस्थेने निरीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालात पिंपरी चिंचवड पालिकेचे ‘सावली’ केंद्र प्रथम क्रमांकावर ठरले आहे. मुंबई महापालिकेचे ग्रेस निवारा आणि अंबरनाथ नगरपरिषदेचे शहरी निवारा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

🔹 सुरुवात आणि सध्याची व्यवस्था

सावली केंद्राची स्थापना ऑक्टोबर २०२० मध्ये पिंपरी भाजी मंडईच्या पहिल्या मजल्यावर करण्यात आली. १९,०८६ चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या या केंद्रामध्ये १११ लोकांची निवास क्षमता आहे. हे केंद्र रेल्वे स्थानक व बसस्थानकाजवळ असल्याने सहज उपलब्ध आहे. येथे पुरुष, महिला, दिव्यांग व कुटुंबांसाठी स्वतंत्र निवास आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

🔹 उपलब्ध सुविधा

  • पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे व शौचालय
  • दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा
  • स्वयंपाकगृह, गरम पाण्याची सोय, पिण्याचे स्वच्छ पाणी
  • लॉकर्स, मनोरंजनासाठी टीव्ही, वृत्तपत्रे
  • सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा
    या सुविधा पुरविल्या जातात. ‘रिअल लाईफ रिअल पीपल’ ही सामाजिक संस्था या केंद्राचे व्यवस्थापन सांभाळते.

🔹 बेघरांची शोधमोहीम आणि समुपदेशन

ही संस्था दर आठवड्याला रेल्वे स्थानक, बसस्थानक, उड्डाणपूल, मेट्रो स्थानक, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी गस्त घालून बेघरांचे सर्वेक्षण करते. त्यांना समुपदेशन करून ‘सावली’ निवाऱ्यात आणले जाते. यामागे गरजूंना केवळ आश्रय देणेच नव्हे, तर त्यांचे पुनर्वसन व सशक्तीकरण हे मुख्य उद्दिष्ट आहे.

🔹 विविध उपक्रम व पुनर्वसन

या केंद्रात राहणाऱ्यांसाठी –

  • आधार नोंदणी, बँक खाती उघडणे, आरोग्य तपासणी, कौशल्य विकास प्रशिक्षण, लसीकरण असे उपक्रम राबवले जातात.
  • भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, कर्वे संस्था आदींच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम चालतात.
  • आजपर्यंत ३१२ जणांचे पुनर्वसन त्याच्या मूळ घरी किंवा नातेवाईकांकडे करण्यात आले आहे.
  • याशिवाय, १६५ जणांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.

“‘सावली’ हे केवळ निवाऱ्याचे केंद्र नसून गरजू नागरिकांच्या सशक्तीकरणाचे माध्यम ठरले आहे. सुरक्षितता, स्वच्छता, मानवी सन्मान आणि सामाजिक समावेश यावर आमचा भर आहे. या केंद्राला राज्यस्तरीय गौरव मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
शेखर सिंह, आयुक्त व प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
25 ° C
25 °
25 °
90 %
3.7kmh
33 %
Tue
35 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
31 °
Sat
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!