पुणे, : कोटक महिंद्रा बँकेने (केएमबीएल/कोटक) आज त्यांच्या प्रमुख डिजिटल बँकिंग व्यासपीठ असलेल्या ‘कोटक८११’च्या रुपाने एक धाडसी नवीन अध्याय सादर केला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत देण्यात येत असलेल्या अखंड, अंतर्प्रेरणादायी आणि पूर्ण-सेवा अनुभवाचा उत्सव साजर करता येणार आहे. भारताच्या पहिल्या डिजिटल पिढीसाठी डिझाइन केलेले, नवीन ‘कोटक८११’ हे फक्त एक अॅप नाही, तर ते तुमच्या खिशातील एक परिपूर्ण बँक ठरणार आहे.
स्मार्टफोनचा व्यापक वापर, परवडणारी इंटरनेट सुविधा आणि डिजिटल परिसंस्थेवरील वाढता विश्वास यामुळे भारतील ग्राहकांच्या वर्तनात सध्या उल्लेखनीय बदल घडत आहे. एक अब्जाहून अधिक मोबाईल वापरकर्ते आणि तरुण, तंत्रज्ञान-जाणकार लोकसंख्या यामुळे, डिजिटल बँकिंग क्रांतीसाठी आताचे युग सज्ज झाले आहे. आजचे ग्राहक पारंपरिक बँकिंगपेक्षाही आधुनिक सेवेची अधिक मागणी करतात. त्यांना वेग, साधेपणा आणि सुरक्षितता हवी आहे आणि हे सर्व त्यांना प्रथम मोबाईलमध्येच अनुभवता येते. कारण त्यात या सर्व सुविधा अखंडपणे एकत्रित केल्या जात आहेत.
मोहिमेच्या अनावरणाप्रसंगी बोलताना सीएमओ आणि प्रपोजिशनचे प्रमुख रोहित भसीन म्हणाले, की या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग यांनी सादर केलेली एक उत्साही जाहिरात मोहीम आहे, जी आधुनिक बँकिंगचे अखंड, जलद आणि सहज असे सर्व सार टिपते. ‘बँकिंग इतके सुरळीत, ते तर मख्खन आहे’, हा मोहिमेचा मुख्य संदेश आहे. अॅपचा वापरकर्त्यांना येणारा अखंडित अनुभव आणि फक्त काही टप्प्यांमध्ये प्रत्येक आर्थिक गरजा पूर्ण करण्याची क्षमता याद्वारे प्रतिबिंबित केल्या जात आहेत.
‘कोटक८११’चे उद्योग विभाग प्रमुख (बिझनेस हेड) मनीष अग्रवाल म्हणाले, की ‘भारत डिजिटल बँकिंगमधील प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि ‘कोटक८११’ हे याच पार्श्वभूमीवर तयार करण्यात आले आहे. पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत त्वरित कर्ज प्रक्रियेपासून ते अखंड ‘यूपीआय’ रक्कम, स्मार्ट गुंतवणूक साधने आणि कोटक महिंद्रा बँकेच्या विश्वासार्हतेद्वारे समर्थित कॅशबॅकपर्यंतच्या आमच्या सुविधा खरोखरच ‘डिजिटल-फर्स्ट’ अनुभव देतात.हे फक्त वापरण्यातील सुलभतेबद्दल नाही; तर ते विश्वास, सुरक्षितता आणि वापरकर्त्याच्या बँकिंग प्रवासाबद्दल आहे. हेच आमचे वेगळेपण आहे.”
‘कोटक८११’चे सह-प्रमुख जय कोटक यांनी बँकिंग अॅपच्या उत्क्रांतीमागील ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर भर दिला. ‘ही केवळ एक नवीन मोहीम नाही – आम्ही आमच्या ग्राहकांच्या तक्रारींची, त्यांना येणाऱ्या अडचणींची किती मनापासून दखल घेतली, याचे हे प्रतिबिंब आहे. आजचा भारतीय ग्राहक केवळ एका अद्भुत पेमेंट अॅपपेक्षा अधिकची अपेक्षा करतो. त्यांना एक पूर्ण-सेवा देणारी बँक हवी आहे, जी जलद, सहज आणि नेहमीच सुलभ असेल. कोटक८११ नेमके तेच देते.’