पुणे- भारतात सर्वोत्कृष्ट कनेक्टेट तंत्रज्ञान आणणार्या सिग्निफाय या जगभरातील लायटिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज पुण्यातील त्यांच्या पहिल्या एक्सक्लुझिव्ह विझ स्टोअरचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. पुण्यातील हे स्टोअर भुमकर चौक रोड, जिंजर पुणे जवळ, वाकड, पिंपरी चिंचवड येथे सुरु करण्यात आले आहे. यामुळे आता ब्रॅन्डची देशभरात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. या उद्घाटना मुळे सिग्निफाय कडून ग्राहकांना लायटिंगचा समृध्द अनुभव घेऊन कशा प्रकारे कनेक्टेड, कस्टमायझेबल आणि आकर्षक लायटिंगच्या प्रवासाचा समृध्द अनुभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणार्या आयटी आणि रिअल इस्टेट हब्ज पैकी एक असलेल्या पुण्यातील या विझ स्टोअरचे डिझाईन हे शहरातील तरुण, टेक सॅव्ही आणि नाविन्याची आवड असणार्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आले आहे. या स्टोअर मध्ये विझद्वारे पावर्ड फिलिप्सची स्मार्ट एलईडी उत्पादने ठेवण्यात येत असून यामध्ये ग्राहक आता ॲप्स, व्हॉईस असिस्टंट्स, आणि स्मार्ट स्विचेस द्वारे यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. या स्टोअर मध्ये जीवनशैली मध्ये सहज मिसळून जाणार्या लायटिंग सिस्टम्सचा अनुभव घेता येणार आहे. या स्टोअरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांत कनेक्टेड एसकेयूज असून त्यामुळे ग्राहकांना सर्वसमावेशक असा खरेदीचा अनुभव प्राप्त होऊ शकेल.
या उद्घाटनासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलतांना सिग्निफाय ग्रेटर इंडिया च्या कन्झ्युमर बिझनेस से प्रमुख सी अरुण कुमार यांनी सांगितले “पुण्यात सुरु करण्यात आलेल्या विझ स्टोअर मुळे आम्ही भारतातील स्मार्ट होम्स चे भविष्य बदलण्याच्या आमच्या वचनबध्दतेचे प्रतिबिंब आम्ही उमटवत आहोत. पुणे हे शहर नाविन्यपूर्ण पध्दतींसह भविष्यकालीन विचार करणारे शहर असून आमच्या आकर्षक कनेक्टेड लायटिंग अनुभवाची सुरुवात करुन देण्यासाठी हे शहर नैसर्गिक निवडीचे ठिकाण ठरले आहे. या विझ प्लॅटफॉर्म मुळे आम्ही लोकांना त्यांची जागा आकर्षक लायटिंग सह पर्सनलाईज करण्यास प्रोत्साहीत करुन त्यांची जीवनशैली आणि उत्तमता वाढवण्यास प्रोत्साहन देत आहोत. हे स्टोअर म्हणजे केवळ रिटेल स्पेस नाही तर हे एक लाईव्ह एक्सपिरियन्स सेंटर असून ज्यामध्ये कशा प्रकारे तंत्रज्ञान आणि डिझाईन एकत्र येऊन रोजच्या जीवनात बदल घडू शकेल हे दर्शवते.
पुण्यातील विझस्टोअर च्या सुरुवातीमुळे भारतातील सिग्निफायच्या स्मार्ट लाईट बाजारपेठेतील आघाडी मजबूत होईल आणि त्यांच्या कनेक्टेड लायटिंग, सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे आणि संरचनात्मक भागीदारीसह चॅनल पार्टनर्स आणि डिझायनर्स ना लाभ होऊन सिग्निफाय त्यांच्या नाविन्यपूर्ण, वापरकर्ताभिमुख लायटिंग उपायांना भारतीय घरे आणि व्यवसायांच्या गरजांनुसार लाभ देऊ शकेल.