27.4 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeताज्या बातम्या'कम्फर्ट झोन’ सर्वात धोकादायक

‘कम्फर्ट झोन’ सर्वात धोकादायक

‘कम्यूनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ परिषदेचा समारोप

पुणे, -: ” यशस्वी उद्योजक होण्यासाठी संयम, कल्पना, काटकसर , लक्ष्य आणि शिस्त हे अत्यंत महत्वाचे आहे. कम्फर्ट झोन हे सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच ज्ञानाची जोड असणे अत्यंत महत्वाचे आहे.” असे विचार थॉयोकेअरचे संस्थापक डॉ. ए. वेलूमणी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित दोन दिवसीय ‘कम्यूनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड होते.
तसेच, थर्माकॉल मॅन रामदास माने, नाशिक येथील वेदमुथा इंडिस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक अजय वेदमुथा, टायमस लाईफ स्टाइलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत तिवारी, निर्मिती प्रोमक कन्स्लटन्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल वैद्य, वास्तू ग्रुप चे चेअरमन उदय घुगे, राष्ट्रीय सरपंच संसदेचे मुख्य समन्वयक योगेश पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.


डॉ.ए.वेलूमणी म्हणाले, ” यशस्वी होण्यासाठी तुमच्यात जीद्द असणे अत्यंत महत्वाचे आहे. यशस्वीतेचे पाऊल उचलण्यासाठी रिस्क अत्यंत महत्वाची आहे. कोणतेही कार्य करताना त्यात गुणवत्तापूर्ण कार्य असावे. प्रगतीसाठी सतत शिकत रहावे आणि त्यावर विचारमंथन करून प्रॅक्टिस करावी.”
राहुल कराड म्हणाले, ” शिक्षणाबरोबरच जीवन परिवर्तनासाठी नवे प्रयोग करून युवकांची शारीरिक आणि मानसिकदशेत परिवर्तन आणावयाचे आहे. तंत्रज्ञानातील युगात युवा व्यक्तींच्या खांद्यावर सीईओची जवाबदारी देण्यासाठी नवे पाऊले उचले जाणार आहेत. त्यासाठी समाजातील पद्धत बदलावी लागेल. तसेच या परिषदेची ३ आवृत्तीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक वाढविला जाणार आहे.”
अजय वेदमुथा म्हणाले, ” व्यवसाय करतांना सतत परिस्थिती बदलत राहते त्यामुळे नफा, नुकसान होत राहणार. यासाठीच पॅशन असावे आगते. सातत्य असल्याने यश मिळते आणि सतत शिकत राहिल्याने ज्ञान मिळते. जीवनात कधीही मूल्यांबरोबर कधीही तडजोड करू नका. शॉर्टकट ने कधीही यश मिळत नाही. सोबत असणारे कामगार ही सर्वात मोठी ताकत असते त्यांचा सांभाळ करावा.”
यानंतर थर्माकोल मॅन रामदास माने, सुमित तीवारी आणि राहुल वैद्य यांनी व्यवसायातील चढ उताराची माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितले की कष्ट, जिद्द आणि वेळेच्या नियोजनामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकते.
राष्ट्रीय सरपंच संसदेचे मुख्य समन्वयक योगेश पाटील यांनी संपूर्ण परिषदेची माहिती देऊन उद्देश्य सांगितला.
आयोजित परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास शेकडो व्यावसायिक व उद्योजक उपस्थित होते.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.4 ° C
27.4 °
27.4 °
32 %
4.2kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!