30.2 C
New Delhi
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रप्रा. यशोधन सोमण  "महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन २०२५" पुरस्काराने सन्मानित

प्रा. यशोधन सोमण  “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन २०२५” पुरस्काराने सन्मानित

पुणे :  शिक्षण क्षेत्रात नवोन्मेष आणि उद्योग-शिक्षण समन्वयाला दिशा देणाऱ्या कार्यासाठी कीस्टोन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापकीय संचालक प्रा. यशोधन सोमण  यांना “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन २०२५” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांना “उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी समन्वयासाठी राबवलेले क्रांतिकारी उपक्रम” या विशेष श्रेणीत प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला, ज्यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रांतील शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक, उद्योजक आणि नामवंत मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रा. यशोधन सोमण हे शिक्षण क्षेत्रात उद्योगजगतातील गरजा ओळखून शैक्षणिक अभ्यासक्रमांत प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या तंत्रज्ञान व प्रकल्पांचा समावेश करणारे एक visionary academic leader म्हणून परिचित आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्री इंटर्नशिप्स, मेंटरशिप प्रोग्राम्स, लाईव्ह प्रोजेक्ट्स, आणि उद्योगसहकार्य आधारित ओपन इलेक्ट्रिव्ह कोर्सेस यशस्वीपणे राबवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. सोमण यांनी सर्व संबंधित सहकाऱ्यांचे विशेषतः उद्योग भागीदार, इंडस्ट्री मेंटर्स आणि सहकार्य करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था प्रमुखांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नाही तर संपूर्ण समूहासाठी आहे, ज्यांनी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातली भिंत पुसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनासाठी तयार करण्याचे ध्येय साकारले.”

या पुरस्काराद्वारे प्रा. सोमण यांच्या कार्याची दखल घेतली गेली असून, त्यांच्या पुढाकारामुळे उद्योग व शिक्षण क्षेत्रात एक नवे यशस्वी मॉडेल तयार झाले आहे, जे भविष्यात राज्यातील अनेक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल.

“महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन” पुरस्कार दरवर्षी अशा व्यक्तींना दिला जातो, जे शिक्षण व्यवस्थेत नवकल्पना, गुणवत्ता व सामाजिक प्रभाव यांचे संतुलन राखून परिवर्तन घडवतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.2 ° C
30.2 °
30.2 °
58 %
0.1kmh
100 %
Mon
30 °
Tue
37 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!