23.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
Homeआरोग्यसंत निरंकारी मिशनद्वारा इंदिरानगर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

संत निरंकारी मिशनद्वारा इंदिरानगर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे – सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील इंदिरानगर व जनता वसाहत ब्रांच यांनी संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनच्या २९० अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी यांनी २०३ युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी ८७ युनिट रक्त संकलन केले.
या शिबिराचे उदघाटन आदरणीय श्री.ताराचंद करमचंदानी (झोनल प्रमुख, पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये करण्यात आले होते त्यावेळी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनचे अनुयायी हा संदेश निश्चितपणे अमलात आणत असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.


संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार अनंत दळवी व गणेश मोरे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
43 %
3.6kmh
8 %
Wed
25 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!