पुणे, : भारतातील आघाडीची ग्रेड-ए औद्योगिक व लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा विकसित करणारी कंपनी KSH इन्फ्रा हिने तामिळनाडूमधील श्रीपेरंबदूर येथे त्यांच्या दुसऱ्या पार्कसाठी ५५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
ही नवीन प्रकल्प योजना ६० एकर फ्रीहोल्ड जमिनीवर उभी राहणार असून, एकूण १६ लाख चौरस फूट बांधकाम क्षमतेसह साकारली जाणार आहे. श्रीपेरंबदूर-ओरगडम औद्योगिक पट्ट्यात हे प्रकल्प स्थान असून, चेन्नई-बंगळुरू महामार्ग (NE-7), इतर जिल्हा रस्ते व बंदरे यांच्या सुलभ संपर्कामुळे या पार्कला मजबूत मल्टीमॉडाल कनेक्टिव्हिटीचा लाभ होणार आहे.
या भागात आधीच हुंडई, सॅमसंग, डेल, मिशेलिन, जेके टायर, एमआरएफ, फॉक्सकॉन, फ्लेक्सट्रॉनिक्स, नोकिया यांसारख्या प्रमुख कंपन्या स्थायिक आहेत. परिणामी, हा संपूर्ण भाग आता बहु-क्षेत्रीय औद्योगिक क्लस्टर म्हणून विकसित होत आहे.
या भागाचे महत्त्व अधोरेखित करताना पुढील महत्त्वाचे प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत:
- चेन्नई-बेंगलोर महामार्ग (NE7)
- परफेरल रिंग रोड
- परंदूर ग्रीनफील्ड विमानतळ
- मप्पेडु MMLP
- श्रीपेरंबदूर एरोस्पेस पार्क
KSH इन्फ्राच्या या प्रकल्पामुळे विशेषतः ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन कंपन्यांना मोठा फायदा होईल. या प्रकल्पाचे बांधकाम मार्च-एप्रिल २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे १५०० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या प्रकल्पाविषयी बोलताना KSH इन्फ्राचे व्यवस्थापकीय संचालक रोहित हेगडे म्हणाले,
“पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई या चार प्रमुख शहरांमध्ये जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक्स पार्क्स उभारण्याचे आमचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. श्रीपेरंबदूर येथील हा नवीन प्रकल्प आमच्या दृष्टीकोनात महत्त्वाचा टप्पा आहे. पुढील २ ते ३ वर्षांत आम्ही १ कोटी चौरस फूटांहून अधिक टिकाऊ आणि उच्च दर्जाचे औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे.”


