पुणे : केंद्रातील मोदी सरकारचा 11 वर्षाचा देश सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल वृक्षारोपणाचा कार्यक्रम विधी महाविद्यालय परिसरात हनुमान टेकडी पायथा (कांचन गल्ली) येथे पार पडला. भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी आणि भाजपा कोथरूड दक्षिण मंडळ अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणा करण्यात आले.
मोदी @ ११ ह्या अभियानाबद्दल थोडीशी माहिती देऊन, ह्या अभियाना अंतर्गत आपण वृक्षारोपणाच्याच कार्यक्रमाची आखणी का केली आणि मोदी सरकारने जागतिक पर्यावरण दिनी पुरस्कृत केलेले वृक्ष संरक्षण अभियान काय आहे ह्याबद्दलचे समर्पक असे विवेचन ह्या निमित्ताने उपस्थित नागरिकांसमोर करण्यात आले. निसर्ग हाच मानवी अस्तित्वाच्या स्थिरतेचा आणि कल्याणाचा पाया आहे हे आपण कधी ही विसरता कामा नये असे उद्बोधन ह्यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा कार्यकर्त्या केतकी देशपांडे यांनी केले असून वृक्षारोपण संबंधी प्रबोधन रोहिणी चाफळकर यांनी केले. प्रिया रानडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास प्रभाग 13 मधील सर्व पदाधिकारी तसेच विधी परिसर, प्रभात रोड, भांडारकर रोड येथील पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदी @11 अभियना अंतर्गत प्रबोधन कार्यक्रम आणि वृक्षारोपण संपन्न
RELATED ARTICLES
New Delhi
mist
12.1
°
C
12.1
°
12.1
°
82 %
0kmh
0 %
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
22
°


