पुणे- भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग परिषदेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी अक्षय बोराटे यांची निवड करण्यात आली.भारत सरकारच्या ‘हर घर रोजगार,हर हात को काम’ या संकल्पपूर्तीसाठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनी बोराटे यांची निवड केली आहे.सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग ‘एमएसएमई’ हे भारत सरकारचे मंत्रालय आहे.जितन राम मांझी हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत.भारतातील सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित नियम,नियम आणि कायदे तयार करण्यासाठी आणि प्रशासनासाठी ही सर्वोच्च कार्यकारी संस्था आहे. ही परिषद भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या व्यापक चौकटीअंतर्गत काम करते आणि धोरणे तयार करण्यात, वकिली करण्यात आणि एमएसएमई क्षेत्राच्या वाढीस आणि शाश्वततेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘एमएसएमई’ च्या माध्यमातून ‘हर घर रोजगार,हर हात को काम’ असा संकल्प सोडला आहे.त्यानुसार राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनी देशभरात योजना राबवित आहेत.महाराष्ट्र राज्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अक्षय बोराटे यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अक्षय बोराटे हे पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी असून गेली अनेक वर्षे उद्योग,व्यवसाय वृद्धीसाठी समाजकारणात सक्रिय आहेत.गेल्या १० वर्षांपासून ‘निर्मिक कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक कमावून आहेत.गावात राहणाऱ्या तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार मिळावा,वाढत्या शहरीकरणास आळा बसावा आणि आत्मनिर्भर खेडी विकसित व्हावीत हा या योजनेचा मूळ हेतू आहे.अक्षय बोराटे हे राज्यातील बेरोजगारांचा आवाज बनून केंद्र आणि राज्य सरकारच्या एमएसएमई च्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी होतील असा विश्वास प्रदीप मिश्रा यांनी निवडीवेळी व्यक्त केला.निवडीनंतर बोलताना अक्षय बोराटे म्हणाले,मी स्वतः ग्रामीण भागातील असल्याने मला ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा माहिती आहेत.या तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असूनदेखील योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांनी शहरी भागात जाऊन तुटपुंज्या पगाराची नोकरी करून गुजराण करावी लागते.ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रचंड मोठी नैसर्गिक साधनसामग्री,जैवविविधता आहे.नवनवीन उपक्रम राबवून खेड्यातुन नवे उद्योजक घडविण्यासाठी, नवे उद्योग उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.लवकरच राज्यभर दौरे काढून परिषद बळकट करून योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याभर आपण भर देणार आहोत.
या निवडीबद्दल अक्षय बोराटे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
‘एमएसएमई’ परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अक्षय बोराटे
RELATED ARTICLES
New Delhi
mist
27.1
°
C
27.1
°
27.1
°
89 %
1.5kmh
40 %
Fri
34
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°
Tue
38
°