32.1 C
New Delhi
Tuesday, September 23, 2025
Homeक्रीड़ा६ धावांचा थरार; मालिका बरोबरीत सुटली!"

६ धावांचा थरार; मालिका बरोबरीत सुटली!”

भारताचा रोमहर्षक विजय

  • भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानची अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चुरशीच्या वातावरणात अखेर बरोबरीत सुटली. पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने अवघ्या ६ धावांनी थरारक विजय मिळवत मालिका २-२ अशी बरोबरीत राखली.
  • मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या प्रचंड दमदार गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज अक्षरशः झुकले. इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान देण्यात आले होते. रुट आणि ब्रुकच्या झंझावाती शतकांनी इंग्लंड विजयाच्या दिशेने झेपावत असताना, सिराजने अंतिम स्फोट घडवला. त्याच्या अचूक माऱ्याला प्रसिद्ध कृष्णाने ताकद दिली आणि भारताने विजय खेचून आणला.
  • इंग्लंडचा डाव ८५.१ षटकांत ३६७ धावांवर आटोपला. फक्त ६ धावांनी विजय निसटल्याने इंग्लंडच्या चेहऱ्यावर निराशा तर भारताच्या संघात आनंदाचे जल्लोष दिसून आले.
  • ही संपूर्ण मालिका अत्यंत रंगतदार ठरली. दोन्ही संघांनी दोन-दोन सामने जिंकले आणि एक ऐतिहासिक क्रिकेट संघर्ष प्रेक्षकांच्या आठवणीत कोरला गेला.
  • भारतीय गोलंदाजांमध्ये सिराजने निर्णायक वेळेस वादळी प्रदर्शन करत सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. प्रसिद्ध कृष्णाही त्याला योग्य साथ देत इंग्लंडच्या तळाला हादरवून गेला.
  • जो रुट आणि हॅरी ब्रुक यांची झोकून दिलेली खेळी आणि शतकी झुंज अखेर व्यर्थ गेली. भारताने शेवटच्या दिवशी मैदानात हृदयधडकी वाढवणारी कामगिरी करत चाहत्यांना रोमांचित केलं.

    शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय संघाने जे करून दाखवल आहे, ते भलाभल्या दिग्गजांना जमलं नव्हतं. ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये पूर्ण जोर लावला आणि इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. हा सामना भारतीय संघाने ६ धावांनी जिंकून मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे दोघेही भारतीय संघाच्या ओव्हल विजयाचे हिरो ठरले आहेत.
    या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २४७ धावा करता आल्या होता. यासह इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. अवघ्या ७ धावा करत माघारी परतला होता. तर साई सुदर्शनला अवघ्या ११ धावा करता आल्या. भारतीय संघाला सुरूवातीला २ मोठे धक्के बसले. पण त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने आकाशदीपने ६६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याने यशस्वी जैस्वालसोबत मिळून शतकी भागीदारी केली. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने १११ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिलने ११, करूण नायरने १७ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने ५३, ध्रुव जुरेलने ३४, वॉशिंग्टन सुंदरने ५३ धावांची खेळी करत संघाचा डाव ३९६ धावांपर्यंत पोहोचवला.
  • या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला बेन डकेट आणि जॅक क्रॉउले यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. क्रॉउलेने १४ धावा केल्या, तर बेन डकेटने ५४ धावांची खेळी केली. कर्णधार ओली पोपने २७ धावांची खेळी केली. जो रूट पुन्हा एकदा इंग्लंडसाठी खंबीरपणे उभा राहिला. त्याने १०५ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकने १११ धावांची खेळी केली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
32.1 ° C
32.1 °
32.1 °
43 %
2.6kmh
6 %
Tue
33 °
Wed
37 °
Thu
38 °
Fri
38 °
Sat
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!