पुणे : केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी, देहूरोड येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रशेखर सिंह चौहान यांनी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी मुख्याध्यापक श्री. प्रभीर नाग, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर प्राचार्य श्री. चौहान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण आपल्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व विसरू नये आणि नेहमी त्याची कदर केली पाहिजे.”

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गटगायन, गटनृत्य आणि प्रभावी भाषणांद्वारे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना गोडधोड वाटप करण्यात आले.
या निमित्ताने विद्यालय परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.


