पुणे : आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ वास्तुमार्गदर्शक व पुरातत्त्व अभ्यासक बबनराव पाटील लिखित ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवार, दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. शिखर बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष, ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘वारी पंढरीची’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, स्वाती यादव, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, डॉ. मिलिंद शेंडे, विजय सातपुते, सुजित कदम, जयश्री श्रोत्रिय यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
30.4
°
C
30.4
°
30.4
°
63 %
5.2kmh
9 %
Sun
33
°
Mon
32
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
35
°