पुणे – : अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड, पूर्वाश्रमीची मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांनी टियर १ च्या पलीकडे जाऊन ग्रामीण भारतातील नवीन प्रादेशिक बाजारपेठांमध्ये वाजवी दरातील जीवन विमा उपायांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने एका धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.
ही भागीदारी आयपीपीबीच्या ६५० बँकिंग आउटलेट्स आणि १.६४ लाखांहून अधिक प्रवेश पॉइंट्सच्या मजबूत नेटवर्कचा वापर करून टियर ३, टियर ४ आणि ग्रामीण बाजारपेठांमधील ग्राहकांना गरजेनुसार जीवन विमा उपायांचा एक व्यापक संच देईल. केंद्र सरकारच्या आर्थिक समावेशन उद्दिष्टांशीदेखील ही बाब सुसंगत असून ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ साध्य करण्याच्या आयआरडीएआयच्या दृष्टिकोनाला समर्थन देते.
जीवन विमा अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवताना अॅक्सिस मॅक्स लाईफ आपल्या प्रमुख स्मार्ट वेल्थ अॅडव्हान्टेज गॅरंटी प्लॅन (एसडब्ल्यूएजी), स्मार्ट व्हाइब प्लॅन आणि विविध टर्म इन्शुरन्स प्लॅनसह विविध प्रकारच्या अनुकूलित उत्पादने देईल. ही उत्पादने त्वरित उत्पन्न आणि संपूर्ण आयुष्यभर उत्पन्न पर्यायांपासून ते तरुण ग्राहकांसाठी आवश्यक संरक्षण आणि समकालीन बचत लिंक्ड सोल्यूशन्सपर्यंत विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
वितरण मॉडेलचे व्यवस्थापन अॅक्सिस मॅक्स लाईफच्या प्रादेशिक प्रमुखांकडून केले जाईल. ते भारतातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक झोन ड्रायव्हिंग अंमलबजावणी आणि समन्वयाचे निरीक्षण करतील. याव्यतिरिक्त अॅक्सिस मॅक्स लाईफच्या टीम आयपीपीबीच्या केंद्रीय कार्यालयातील भागधारकांना नियमित प्रशिक्षण आणि संरचित सहभागाद्वारे स्थानिक संबंध दृढ करण्यासाठी आणि सातत्यपूर्ण संबंध स्थापित करण्यासाठी सहभागी करतील.
अॅक्सिस मॅक्स लाईफचे मुख्य वितरण अधिकारी सुमित मदन यांनी सांगितले की, “इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबतची ही भागीदारी महानगरांच्या पलीकडे जीवन विमा भारतातील नवीन प्रादेशिक आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते, कारण तिथे विम्याची व्याप्ती कमी आहे. आम्ही शहरी भारताला सेवा देत असताना, आमचे प्राधान्य म्हणजे व्याप्ती वाढवणे आणि विकासाच्या पुढील सीमेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वर्गांत सखोल विश्वास निर्माण करणे हे आहे. आयपीपीबीच्या विस्तृत पोस्टल नेटवर्कद्वारे आमची जीवन विमा आणि हमी उत्पादने देऊन ही भागीदारी आयपीपीबीसारख्या विश्वासार्ह सरकारी संस्थेचा फायदा घेऊन बँकेत नवीन येणाऱ्या आणि पहिल्यांदाच विमा घेणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.”
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि सीएसएमओ श्री. गुरशरण राय बन्सल म्हणाले, “आयपीपीबी सरकारच्या आर्थिक समावेशन उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्ससोबतची आमची भागीदारी ही त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आमच्या विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील उत्तम व्याप्तीचा घेऊन हे सहकार्य ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या मोठ्या लोकसंख्येसाठी अत्यंत आवश्यक जीवन विमा उपाय आणेल असा आम्हाला विश्वास आहे. या उपक्रमामुळे लोक आणि कुटुंबांची आर्थिक सुरक्षितता वाढेलच, परंतु देशाच्या एकूण आर्थिक कल्याणातही योगदान मिळेल.”
या भागीदारीमुळे अॅक्सिस मॅक्स लाईफसाठी प्रादेशिक व्याप्ती आणि ग्रामीण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विस्तार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे लाखो आयपीपीबी ग्राहकांना, ज्यात नवीन विमा विभागांचाही समावेश आहे, पोहोच मिळेल. अॅक्सिस मॅक्स लाईफच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना अखंड पॉलिसी सेवेचा फायदा होईल. त्यात त्याचे मोबाइल अॅप आणि वेबसाइट समाविष्ट असून ते रिअल-टाइम ट्रॅकिंग, प्रीमियम पेमेंट, पॉलिसी बदल आणि संबंधित कागदपत्रे जारी करण्याची परवानगी देतात.