29.2 C
New Delhi
Tuesday, September 9, 2025
Homeमनोरंजनश्री चिंतामणीच्या दरबारात 'देवघर ऑन रेंट' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित२८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात...

श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित२८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

असंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला आहे. शीर्षकामुळे मनात उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी होणाऱ्या ‘देवघर ऑन रेंट’च्या टिमने चिंतामणीचे मनोभावे दर्शन घेतले आणि गणरायाच्या आशीर्वादाने चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या प्रसंगी चित्रपटातील कलावंत, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञांची टिम उपस्थित होती. हा चित्रपट २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

राधाकृष्ण प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कथालेखन स्वरूप सावंत, पूनम चौधरी पाटील, तर पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. अतिरिक्त पटकथा विशाल सुदाम जाधव यांनी लिहिली आहे. हा चित्रपट आध्यात्माची वर्तमानाशी सांगड घालणारा असल्याची जाणीव ‘देवघर ऑन रेंट’ या शीर्षकावरूनच होते. त्याला अनुसरूनच प्रदर्शित करण्यात आलेला टिझर चित्रपटाची तोंडओळख करून देणारा आहे. बेभानपणे जगताना आपल्या आतल्या आवाजाला आपण शरण गेलो तर आयुष्यातले सगळे मार्ग सोपे बनू शकतात. फक्त मार्ग निवडण्याची किंवा तो चुकलाच तर बदलण्याची आपली इच्छाशक्ती असली पाहिजे हा अध्यात्माशी सांगड घालणारा विचार ‘देवघर ऑन रेंट’मध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. याची झलक टिझर पाहिल्यावर नक्कीच येते.

चित्रपटाबाबत दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणाले की, आज सगळीकडे गणेशात्सवाचा जल्लोष आहे. ‘देवघर ऑन रेंट’ या चित्रपटाच्या शीर्षकातच देव दडला असल्याने श्री चिंतामणीच्या दरबारात टिझर प्रदर्शित झाल्याचा खूप आनंद आहे. हा चित्रपट जरी आजची गोष्ट सांगणारा असला तरी यातील आध्यात्माचा धागा अतिशय महत्त्वाचा असल्याचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केले. आजच्या शर्यतीच्या जीवनात देवाचे अस्तित्व कोणीही नाकारू शकणार नाही. यातील शीर्षकाप्रमाणे आज जरी कोणी ‘देवघर ऑन रेंट’ असे म्हटले तरी देव मात्र त्याला क्षणभरही दूर लोटणार नाही. ‘चाले हे शरीर कोणाचीये, सत्ते कोण बोलविते हरिवीण…’ या संतवचनानुसार ती दैवी शक्ती गरीब असो, वा श्रीमंत सर्वांचा सांभाळ करते. ‘देवघर ऑन रेंट’ या चित्रपटात नाट्यमय कथानकासोबत मनोरंजनपर सर्व गोष्टी आहेत, ज्या प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतील असे निर्मात्या पूनम चौधरी पाटील यांनी सांगितले.

या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, चेतन रायकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत. चैतन्य साळुंखे यांनी छायाचित्रण केले असून, दिलीप कंधारे कला दिग्दर्शक आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील गीतांना सुमधूर संगीत दिले आहे. अपेक्षा गांधी सोनी या चित्रपटाच्या वेशभूषा डिझायनर असून, सुजीत सुरवसे यांनी मेकअप केला आहे. सिंक साऊंड अक्षय लोणदे यांनी केले असून, शर्मा यांच्या टिमने प्रकाश योजना सांभाळली आहे. अनुनेहा घोडके कार्यकारी निर्माती, तर यश सणस निर्मिती व्यवस्थापक आहेत. नृत्य दिग्दर्शन किशोर दळवी यांनी केले असून विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
1.5kmh
6 %
Tue
35 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!