पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने (हडपसर) सादर केलेल्या काही प्रॉब्लेम ये का? एकांकिकेने बाजी मारत हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला 5001 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी या वर्षी एकही एकांकिका पात्र ठरलेली नाही.
स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि 3001 रुपयांचे रोख पारितोषिक वामन आख्यान (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड) एकांकिकेने तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि 2001 रुपयांचे पारितोषिक आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय) या एकांकिकेला जाहीर करण्यात आला.
हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (दि. 13) आणि रविवारी (दि. 14) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघाचे तीन सत्रात सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी (दि. 14) रात्री जाहीर करण्यात आला.
योगेश सोमण, अश्विनी गिरी, प्रदीप वैद्य यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
: स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : काही प्रॉब्लेम ये का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
सांघिक द्वितीय : वामन आख्यान (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)
सांघिक तृतीय : आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : पारितोषिक दिलेले नाही
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : अथर्व किरवे, क्षितिज दीक्षित (कोयता, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : सोहम कुलकर्णी, इश्वरी जोशी (हॅपी बर्थडे कप केक, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वायत्त)
उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका : अपूर्वा काळपुंड (पिसाळा, न्यू आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आस्था काळे (काही प्राब्लॅम ये का?, अण्णासाहेब मगर कॉलेज, हडपसर)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : अनिकेत खरात, विराज दिघे (वामन आख्यान, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : अद्वय पूरकर, शाश्वती वझे, समर्थ खळदकर (आतल्या गाठी, सर परशुराम भाऊ महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : पारितोषिक दिलेले नाही
अभिनय नैपुण्य (अभिनेता) : ओमकार कापसे (प्रतिक, काही प्रॉब्लेम ये का?, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : शाश्वती वझे (जुई, आतल्या गाठी, सर परशुरामभाऊ महाविद्यालय)
वाचिक अभिनय नैपुण्य : तृप्ती येवले (म्हातारी, रामरक्षा, आयएमसीसी)
अभिनय उत्तेजनार्थ (अंतिम फेरी) : विद्यार्थी, भूमिका, एकांकिका महाविद्यालय या क्रमाने
अद्वय पूरकर (अर्णव, आतल्या गाठी, सर परशुरामभाऊ महाविद्यालय)
शर्व कुलकर्णी (अनिरुद्ध, पावसात आला कोणी, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय)
आयुष वाघ (महादेव, रामरक्षा, आयएमसीसी)
क्षितिज दीक्षित (अमोल दरड, कोयता, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय)
मित कुलकर्णी (सावळा कुंभार, यथा प्रजा तथा राजा, म. ए. सो. सिनिअर कॉलेज)
स्नेहल पाटे (गंगी, यथा प्रजा तथा राजा, म. ए. सो. सिनिअर कॉलेज)
आस्था काळे (दृष्टी, काही प्रॉब्लेम ये का?, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
समिक्षा काळे (बहिण, काही प्रॉब्लेम ये का?, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
गौरी देशपांडे (गौरी, रामरक्षा, आयएमसीसी)
केतकी भालवणकर (सरिता, वामन आख्यान, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)