ललित-ऋताची लव्हेबल केमिस्ट्री ‘आरपार’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर, १२ स्पटेंबरपासून चित्रपटगृहात
‘आरपार’ सिनेमाला चित्रपटगृहात उदंड प्रतिसाद, ऋता-ललितची केमिस्ट्री करतेय साऱ्यांच्या मनावर राज्य
सध्या सर्वत्र एका मराठी चित्रपटाच्या टिझर, पोस्टर आणि गाण्यांनी हवा केलेली पाहायला मिळतेय. या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस आल्याचं चित्रपटातून समोर आलं आणि चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेली. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांचा ‘आरपार’ हा सिनेमा येत्या १२ सप्टेंबर पासून सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली होती. शिवाय ललित आणि ऋताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि या चाहत्या वर्गाला या दोन्ही कलाकारांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहणं खूप रंजक ठरलं. आणि बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत हा सिनेमा चर्चेत आला आहे. इतकंच नाहीतर चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा तुफान गाजत आहे.
‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ हे सांगणारा हा रोमँटिक चित्रपट आता मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. ललित आणि ऋतासह चित्रपटात कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. अभिनेते माधव अभ्यंकर, सुहिता हट्टे, स्नेहलता वसईकर, वीणा नायर, जान्हवी सावंत ही कलाकार मंडळीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याचबरोबर चित्रपटाची खास बाब म्हणजे चित्रपटातील गाणी. रोमँटिक गाण्यांसह चित्रपटातील जागरण गोंधळने तर साऱ्यांच लक्ष वेधलं. चित्रपटातील काही गाणी थिरकायला भाग पाडण्यास लावत आहेत यांत शंकाच नाही. चित्रपटात ललित- ऋता यांच्यातील प्रेम आणि दुरावा याचे समीकरण पाहायला मिळत आहे.
‘लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी’ प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित ‘आरपार’ हा सिनेमा आहे. तर अभिनेता ललित प्रभाकरने या चित्रपटाची सहनिर्माता ही भूमिका सांभाळली आहे. अभिनयाबरोबर आता ललितने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा ऋता व ललित या नव्या जोडीसह सगळ्याच बॉक्स ऑफिसवर गाजतोय.