पिंपरी,- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १९ वर्षाखालील गटात ॲक्रोबॅटिक स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत ११ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय ॲक्रोबॅटिक स्पर्धा २०२५ – २६ निगडी येथील एलाइट फिटनेस अकॅडमी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विविध गटातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. यामध्ये मुलींच्या संघात इयत्ता ६ वी मधील वीरा काटकर, वैदेही निकम आणि आर्या थोरात यांनी सुवर्ण पदक जिंकले. सावनी बडवे (इयत्ता ६ वी) आणि ओम पाटील (इयत्ता ९ वी) यांनी मिश्र जोडीत सुवर्ण पदक मिळवले.
मुलांच्या संघात इयत्ता ८ वी मधील रुद्र जंगलीवाड, अमित कोडगुनूरा, राजवीर अंजुरे, आदित्य खाडे, पवन खैरनार आणि इयत्ता ६ वी मधील अनय पवार यांनी सुवर्ण पदक मिळवून शाळेचा मान वाढविला. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.मुलींच्या संघात आबोली डोंबाळे (इयत्ता ७ वी) आणि श्रावणी भोंडवे (इयत्ता ७ वी) यांनी रौप्य पदक पटकावले. प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व क्रीडाशिक्षक धनाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील विभागीय आणि राज्य स्पर्धेंसाठी यशस्वी होण्यास शुभेच्छा देऊन कौतुक केले.
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची ॲक्रोबॅटिक स्पर्धेत ११ सुवर्ण पदकांची कमाई
New Delhi
haze
31.1
°
C
31.1
°
31.1
°
62 %
0kmh
20 %
Thu
33
°
Fri
38
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°