पुणे, – अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानातील जागतिक पातळीवरील अग्रणी कंपनी असलेल्या जेबीटी मरेलने आज भारतातील त्यांच्या जागतिक उत्पादन केंद्राचे (जीपीसी) उद्घाटन केले. जागतिक दर्जाच्या उत्पादनांद्वारे भारतीय आणि आशिया-पॅसिफिक बाजारपेठांना सेवा पुरविण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
जेबीटी मरेल इंडिया प्रा. लि, विवान कोहली इंडस्ट्रियल इस्टेट, जुना मुंबई पुणे हायवे , नायगाव , तालुका – मावळ, वडगाव, पुणे येथे नवीन सुविधेचे उद्घाटन ब्रायन डेक, सीईओ जेबीटी मरेल, ऑगस्टो रिझोलो क्षेत्र आणि एकत्रीकरण विभागाचे अध्यक्ष , बॉब पेट्री उपाध्यक्ष आणि अध्यक्ष मेट आणि प्रीपर्ड फूड्स आणि जॅक मार्टिन उपाध्यक्ष आणि मुख्य सप्लाय चैन ऑफिसर यांच्या हस्ते करणात आले त्यावेळी मॅन्युएल कॉफमन, वरिष्ठ संचालक, डीएफ अँड एच एपीएसी, पेर फ्रिबर्ग, वरिष्ठ संचालक, प्रीपर्ड फूड्स; आणि विक्रम मुलमुले, उपाध्यक्ष, दक्षिण आशिया, शिवेंद्र सिंग, ऑपरेशन्स मॅनेजर, दक्षिण आशिया उपखंड, जेबीटी मरेल यांच्यासह अन्य मान्यवरवरही उपथित होते
उत्पादन क्षमता वाढविणे आणि या प्रदेशातील कार्यक्षम व शाश्वत अन्न प्रक्रियेची वाढती मागणी पूर्ण करणाऱ्या अत्याधुनिक प्रक्रियांचे प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने या जीपीसीची रचना केली आहे.
समारंभात बोलताना क्षेत्र आणि एकत्रीकरण विभागाचे अध्यक्ष ऑगस्टो रिझोलो म्हणाले: “भारतातील जागतिक उत्पादन केंद्र हा आमच्यासाठी एक अभिमानास्पद मैलाचा दगड आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात नवोपक्रम राबविण्याच्या आमच्या कटिबद्धतेला तो बळकटी देतो. हा प्रकल्प जागतिक तज्ज्ञता केवळ दक्षिण आशियातील आमच्या ग्राहकांच्या समीप आणत नाही तर व्यापक आशियाई प्रदेशाला सेवा पुरवू शकणाऱ्या प्रगत उत्पादनांचे एक प्रमुख केंद्र म्हणून भारताला सुस्थापित करते.”
भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग हा जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक असून उत्पादन जीडीपीमध्ये त्याचे जवळजवळ १२ टक्के योगदान आहे आणि तो ८० लाखापेक्षा अधिक लोकांना रोजगार पुरवतो. पॅकबंद आणि रेडी-टू-ईट अन्नपदार्थांची वाढती ग्राहकांची मागणी, तसेच मेक इन इंडिया आणि अन्न प्रक्रियेसाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेसारख्या सरकारी उपक्रमांमुळे भारत हा नावीन्यपूर्णतेसाठी जागतिक केंद्र म्हणून झपाट्याने पुढे येत आहे.
जेबीटी मरेलचे नवीन जीपीसी भारतीय कंपन्यांना प्रगत, शाश्वत उपाय प्रदान करून या वाढीला आधार देण्यासाठी रणनीतिकदृष्ट्या योग्य स्थानी आहे. तसेच आशियाई प्रदेशासाठी निर्यातीचे केंद्र म्हणून ते काम करते.
या उद्घाटनासोबतच जेबीटी मरेल “अन्नाचे भविष्य बदलणे” या आपल्या उद्देशाचा पुनरुच्चार करत आहे. तसेच जगातील सर्वात गतिमान अन्न बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात नवोपक्रम, शाश्वतता आणि ग्राहक-केंद्रित वाढीवर लक्ष केंद्रित करण्यावर तिचा भर वाढवत आहे.