प्लॅनच्या सुरुवातीपासून रेग्युलर इन्कम, सात दिवसांच्या आत कॅशबॅक, ४० वर्षांपर्यंत गॅरंटीड रिटर्न्स आणि रायडर्ससोबत कॉम्प्रीहेन्सीव्ह लाईफ कव्हर – सर्व सुविधा असलेला एकच शक्तीशाली प्लॅन
पुणे – : कोटक महिंद्र लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वित्तीय सुरक्षेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सक्षम करण्याच्या आपल्या कार्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना कंपनीने कोटक एज (एर्ली डिफाईन्ड गॅरेंटेड अर्निंग्ज) हा नवीन इन्शुरन्स प्लॅन आणला आहे. हे कॉम्प्रीहेन्सीव्ह लाईफ इन्शुरन्स सोल्यूशन आजच्या युगातील ग्राहकांच्या बदलत्या वित्तीय गरजांची पूर्तता करते.
आजच्या गतीमान युगात ग्राहकांना अनेक वित्तीय गरजांना सामोरे जावे लागते आणि त्या तत्काळ पुर्ण करणे गरजेचेही असते. ही तातडीची गरज कोटक एज इन्शुरन्स प्लॅन पूर्ण करतो. हा प्लॅन रेग्युलर इन्कम प्रदान करत असल्याने अतिरिक्त उत्पन्नाच्या स्त्रोतातून पॉलिसीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतो. या प्लॅनमधील इन्कम ऑन डिमांड ही सुविधा जीवनातील तातडीच्या गरजा पूर्ण करण्याचा उद्देशाने विकसित करण्यात आलेली आहे.
इमेजीएट लिक्विडीटी आणि लॉन्ग टर्म गॅरंटीड इन्कम यांच्या संयोजनातून कोटक एज पॉलिसीधारकाला रेग्युलर पेआऊट, अर्ली रेग्युलर इन्कम, गॅरंटीड रिटर्न्स आणि कॉम्प्रीहेंसिव्ह लाईफ कव्हर या सर्व सुविधा एकाच प्लॅनमध्ये प्रदान करते.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
कॅशबॅकः पॉलिसी जारी झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत अॅन्यूअलाईज्ड प्रिमीयमच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम परत
गॅरंटीड रेग्युलर इन्कम: १३ व्या महिन्यापासून सुरू होते, ४० वर्षांपर्यंत चालू राहते.
कॉम्प्रीहेंसिव्ह लाईफ कव्हर: पॉलिसीच्या संपुर्ण मुदतीत संरक्षण
लंप सम मॅच्युरिटी बेनिफिट: तुमचे सर्व प्रिमीयम परत मिळवा
फ्लेक्झीबल इन्कम ऑप्शन: रेग्युलर पेआऊट निवडा अथवा अॅक्युम्युलेट करा नंतर एन्कॅश करा
आरोग्य आणि निरोगीपणासाठीच्या सेवाः तुमच्या सुदृढ आरोग्यासाठी अनेक सुविधा
नवीन योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना महेश बालसुब्रमणीयन म्हणाले, आमचे वित्तीय पर्याय हे आमच्या ग्राहकांच्या जीवनासोबत विकसित झाले पाहिजे, या विश्वासावर आमची २५ वर्षांची वाटचाल साकारली गेली आहे. कोटक एज हा याच तत्वावर आधारलेला एक वित्तीय पर्याय आहे – तो लॉन्ग टर्म प्रोटेक्शन आणि फायनान्शिअल स्टॅबिलिटीशी कोणतीही तडजोड न करता अर्ली इन्कम सपोर्ट प्रदान करतो. आम्ही भविष्याचा वेध घेत असताना, ग्राहकांप्रती सहानुभूती आणि नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्ध आहोत. तसेच आमच्या ग्राहकांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अतिशय आत्मविश्वासाने जगण्यास सक्षम बनवत आहोत.”
कोटक लाईफने आर्थिक स्थिरता आणि ग्राहक सेवेवर आपले लक्ष केंद्रित केले, हे कंपनीच्या आर्थिक कामगिरीतून प्रतिबिंबित होते. ३१ मार्च २०२५ पर्यंत, कंपनीने ९८.६ टक्के क्लेम सेटलमेंट रेशो, नॉन-इन्व्हेस्टीगेटीव्ह क्लेमसाठी वन-डे सेटलमेंट आणि सॉल्व्हन्सी रेशो २.८६# इतका राखला आहे.