संगीत नाटकांना पुनर्जिवन करून नवसंजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण काम जयमाला शिलेदार यांनी केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मरण करताना त्यांचे अमूल्य योगदान मराठी रसिक सदैव लक्षात ठेवतील, अशा भावना ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि गायिका राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर यांनी व्यक्त केले. पुणे नवरात्रौ महोत्सवातील ‘स्वर सम्राज्ञीयाँ’ या कार्यक्रमाच्या प्रारंभी जयमाला शिलेदार यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा रंगमंचा येथे झालेल्या कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संयोजक आबा बागुल व गायिका राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर यांनी जयमाला शिलेदार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली.

यानंतर नामांकित गायिका राधिका अत्रे निर्मित महिला गायिकांचा ‘स्वर सम्राज्ञीयाँ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर या प्रसिद्ध गायिकांनी विविध सुरेल गाण्यांचे माध्यमातून रसिकांची मने जिंकली. शिलेदार यांचे प्रसिद्ध “पारिजात फुलला अंगणी..” हे गाणे गात गायिका राजेश्वरी पवार यांनी कार्यक्रमाची सुरेख सुरुवात केली. सरस्वती स्तोत्र गायन नंतर “सांचा नाम तेरा” …”बचपन के दिन भूला न देना”.. काहे तरसाये”.. “हुजुरेवाला”.. गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.”तुमको पिया दिल दिया”..या गाण्यास रसिकांनी वन्स मोअर म्हणत कलाकारांचा उत्साह वाढवला. १९५५ सालच्या “आपलम चपलम” गाण्याला गायकांनी गाताच रसिकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. गायिका राधिका यांनी एकाचवेळी पहाडी आणि नाजूक अशा दोन आवाजात गायलेले ” तेरे महेफिल मे”.. गाणे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचे पहावयास मिळाले. निवेदिका प्राजक्ता मांडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमातून विविध गाण्यांचे महत्त्व स्पष्ट करत संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमात वादक अमन सैय्यद,ओमकार पाटणकर (सिंथेसायझर), विशाल थेलकर (गिटार), निशित जैन (बासरी), केविन (ड्रम्स),अजय अत्रे (रीदम मशीन, ऑक्टोपॅड),हर्षद गनबोटे (तबला, परकशन),रोहित जाधव (ढोलक),अमित सोमण, राकेश जाधव (साऊंड इंजिनिअर) यांनी सहाय्य केले.
याप्रसंगी जयश्री बागुल, निवृत्त अभियंता सतीश मानकामे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,अमित बागुल, सागर बागुल उपस्थित होते.