101 कुमारीकांचे पूजन व 250 विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य यांचे वाटप.
पुणे-ललिता पंचमी चे औचित्य साधुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने धायरी, पुणे येथील हरिभाऊ पोकळे विद्यालयातील 101 कुमारीकांचे औक्षण व पूजन करण्यात आले तसेच शाळेतील 250 विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य एक कर्तव्य म्हणुन देण्यात आले.शिस्तबद्ध मांडणी, उत्तम आयोजन, सरस्वती पूजन श्री सूक्त पठण करुन धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात आली.यासाठी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्व विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक संस्कारांची माहिती मिळाली, त्यांच्यासाठी समुपदेशन कार्यशाळा देखील घेण्यात आली व आजचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, सौ केतकी कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी), श्री दत्तात्रय देशपांडे (धायरी शाखा अध्यक्ष), सौ अर्पिता जोशी (शाखा अध्यक्ष महिला आघाडी) यांनी केले. आजच्या या कार्यक्रमाला श्री. राजाभाऊ लायगुडे (मा.नगरसेवक) सौ.निताताई दांगट (मा.नगरसेविका ) श्री. गंगाधर जी भडावळे (स्वीकृत नगरसेवक), सामाजिक कार्यकर्ते तुषार बेनकर,अनंत दांगट, सौ.पुजा रावेतकर (महिला संपर्क प्रमुख) ही राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.तीनही शाळेच्या मुख्याधिपीका, शिक्षक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्थानिक आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांनी कार्यक्रमाला फोन वरून शुभेच्छा दिल्या.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी श्री मंदार रेडे, सौ केतकी कुलकर्णी, श्री विजय शेकदार, सौ वृषाली शेकदार, श्री दत्तात्रय देशपांडे, सौ अर्पिता जोशी, सौ. शोभा श्रीगोंदेकर, नितीन जी फडणीस, रमेश बडगंडी, विवेक कुलकर्णी, गोपाळ ठकार, सौ.जयश्री घाटे,आनंद कुलकर्णी,परेश धर्माधिकारी,सौ कविता फडके, शुभा मोघे, सौ.गायत्री वैशंपायन,सौ.लीना कुलकर्णी यांनी या यशस्वी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या यशात अजुन एक मानाचा तुरा रोवला गेला.
