राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीपाती विरहित संपूर्ण हिंदुसमाजाचे संघटन करतो, संघशाखेद्वारे व्यक्तिमत्व विकसित होत असून चारित्र्यवान व्यक्ती राष्ट्रसेवेसाठी तत्पर असतो. संघाने या शतक महोत्सवी वर्षात सामाजिक परिवर्तनासाठी पंच सूत्रावर काम सुरू केले असून समाजाने याचा अंगिकार करावा ही पंचसूत्री राष्ट्रीय विचारांचे केंद्र बनावे असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र घोष प्रमुख सुहास महाजन यांनी केले ते चिंचवड पश्चिम नगर (चिंचवड गट) विजयादशमी उत्सवात महाराणा प्रताप गोशाळा, पुनरुत्थान गुरूकुलम ,चिंचवड येथे बोलत होते.
यावेळी, चिंचवड गट संघ चालक माननीय प्रतापराव जाधव, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे
उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऋषिकेश अरणकल्ले ( शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त ) प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे अरणकल्ले म्हणाले की, संघाच्या शताब्दी वर्षातील उत्सव हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. पुढे बोलतांना महाजन यांनी संघाच्या स्थापनेची पार्श्वभूमी, संघाचा मागील १०० वर्षातील प्रवास, स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग
संघाचे वेगवेगळे आयाम व सेवा कार्य यांची माहिती दिली.

तसेच आगामी काळाच्या दृष्टीने संघाने पंच परिवर्तनाचे विषय स्व बोध, नागरी कर्तव्य,कुटुंब प्रबोधन,पर्यावरण रक्षण व सामाजिक समरसता याविषयी माहिती दिली. तत्पूर्वी मान्यवरांनी पारंपरिक शस्त्रपूजन केले. उत्सवामध्ये प्रौढ, तरुण व बाल स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिक सादर केले, तसेच घोष (बँड )पथकाने सुद्धा उत्कृष्ट असे घोषचे प्रात्यक्षिक सादर केले. वरील सर्व प्रात्यक्षिकाला, उपस्थिती सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य मान्यवर, नागरिक, महिला उपस्थित होत्या.