27.1 C
New Delhi
Tuesday, October 21, 2025
Homeमहाराष्ट्र'नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल चा ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ने गौरव...

‘नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल चा ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ने गौरव…

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड- – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल घेत विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने  नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल या पिंपरी चिंचवड मधील नामांकित संस्थेला ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा विद्याभारती, अखिल भारतीय शिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने शनिवारी, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ग.दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला केरळ राज्याचे राज्यपाल मा.श्री. राजेंद्र जी अर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. सुरेश जाधव, मुकुंदराव कुलकर्णी, श्री. रघुनाथ देवकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल मार्फत विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, आत्मविश्वास, कौशल्य विकास व सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवले जातात. कला संलग्न शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, क्रीडा व विज्ञान विषयक स्पर्धा, पर्यावरण जनजागृती, स्वच्छ भारत अभियान, प्रकल्प आधारित शिक्षण हे उपक्रम विशेष उल्लेखनीय आहेत. विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित आणि आनंददायी शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे.

या गौरवप्राप्त प्रसंगी पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री. अमित गोरखे , श्री.विलास जेऊरकर ,विद्यालय व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे , नॉव्हेल कॉलेज ऑफहॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. वैभव फंड आणि मुख्याध्यापिका मृदुला  गायकवाड, उपस्थित होते.या सर्वांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत असून, यामुळेच विद्यालयाच्या यशात सातत्य राखले गेले आहे.

हा पुरस्कार नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांची पावती असून हा सन्मान भविष्यातील शैक्षणिक वाटचालीत निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
27.1 ° C
27.1 °
27.1 °
61 %
1.5kmh
0 %
Mon
28 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!