31.1 C
New Delhi
Monday, October 20, 2025
Homeमहाराष्ट्रजन की बात"मध्ये ५९० तक्रांरींची ऑन द स्पॉट सोडवणूक

जन की बात”मध्ये ५९० तक्रांरींची ऑन द स्पॉट सोडवणूक

चिंचवड-: चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून “जन की बात संवाद | सेवा | समर्पण” होत असलेल्या या विशेष कार्यक्रमात प्रभाग क्रमांक २२ व परिसरातील ५९० तक्रारींची ऑन द स्पॉट सोडवणूक करण्यात आली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांसाठी आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून “जन की बात संवाद | सेवा | समर्पण” हा विशेष कार्यक्रम सुरु आहे. गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी काळेवाडीतील ज्योतिाबा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये शासकीय योजना, जनसामान्यांच्या तक्रारी, शासकीय दाखले, महापालिकेशी संबधित तक्रारी, वीज, पाणी, ड्रेनेज अशा विविध प्रकारच्या तक्रारी आमदार शंकर जगताप यांनी या ५९० तक्रारींची तत्काळ सोडवणूक करण्यात केली.

यावेळी परसिरातील माजी नगरसेवक सुरेश नढे,मा. नगरसेविका नीता पाडाळे, मा. नगरसेविका ज्योती भारती,
मा. नगरसेवक प्रमोद ताम्हणकर,
स्वीकृत ड प्रभाग सदस्य विनोद तापकीर, गोपाळ माळेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, रमेश काळे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष
आकाश भारती, मंडल अध्यक्ष चिंचवड काळेवाडी हर्षद नढे,  
भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मा. उप्पर तहसीलदार जयराज देशमुख, क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट,  कार्यकारी अभियंता सोमनाथ मुळे, चंद्रकांत मुठाल,
डॉ विजय क्षीरसागर,राजेश बसावे, महेश बरीदे,दिलीप भोसले, किवण उंदुरे, विजय सोनवणे , सुदिप वाघमारे, अश्विनी गायकवाड, लक्ष्मीकांत कोल्हे आदी महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग, पोलीस आणि इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी आमदार शंकर जगताप उपस्थित महानगरपालिका, तसेचे शासकीय अधिका-यांना नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करणा-या सर्वांनी नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कामाचा वेग असाच ठेवावा, असे आवाहनही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

दिवाळीनिमित्त पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यावर्षीची दिवाळी राज्यातील ज्या भागात पुराचे संकट ओढावले. त्या भागातील नागरिकांसाठी मदत करून साजरी करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. पुरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना आपण दिवाळीनिमित्त मदत करणार आहोत. त्याकरिता जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन देखील या जन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार शंकर जगताप यांनी केले.


वाढत्या शहरीकरणामुळे नक्कीच वेगवेगळे प्रश्न वाढत आहेत. सामान्य नागरिकांकडून रस्ते, कचरा, पाणी, वीजेबाबतच्या तक्रारी असतात. त्यांच्या अशा तक्रारी कोणत्याही अधिका-यांनी प्रलंबित ठेवू नयेत. त्यांची तातडीने सोडवणूक करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा.
– शंकर जगताप, आमदार -चिंचवड विधानसभा मतदारसंघ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
40 %
1.5kmh
0 %
Mon
32 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!