मंचर :धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात बुधवारी(२२ आँक्टो २५)बलिप्रतिपदा.दिवाळी पाडवा.अभ्यंगस्नान.वहीपूजन.अन्नकोट.गोवर्धन पूजन.व दिव्यांची पूजेच्या निमित्ताने खंडेरायाची पारंपारिक फूल —फळ पुजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.आश्विन महिण्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुध्द बलिप्रतिपदेच्या निमित्ताने पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर लोभस मुखवट्याचा दुग्धाभिषेक व पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला.पारंपारिक फूल.फळ.महापुजा पारंपारिक वाद्याच्या गजरात अकरा जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी मंदिराच्या गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती.बुधवारी पहाटे सुवासिक फुलांने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यांना सुवासिक भंडार्याचा लेप लावलेला होता.

खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या वस्त्रालंकाराने सजवलेल्या व नटवलेल्या लोभस मूर्ती. मानकरी पंचरास मंडळीचा पारंपारिक वाद्याचा गजर.मोगर्याच्या व दवण्याच्या अत्तराच्या सुंगधाने दरवळून गेलला मंदिर परिसर.सदानंदाचा येळकोट असा जयघोष करणारे भाविक.आणि आबालवृध्द व त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग हे सगळे भक्तिमय वातावरण दिवाळी पाडव्याच्या पारंपारिक फूल.व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणी खंडोबा देवस्थान मंदिरात दिसून आले.मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात मोगर्याचे व झेंडू अष्टरच्या फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. मंदिराचे शिखरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई.व सुरेख रांगोळी आणि पारंपारिक वाद्याच्या निनादाने व घंटेचा गजराने आणि सदानंदाचा येळकोटच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भल्या पहाटे भक्तिमय झाला होता.शेकडो प्रज्वलीत केलेल्या पणत्यांने मंदिर परिसर उजळून निघालेला होता.फटाक्याची आतषबाजी करण्यात आली याशिवाय कपाळावर भंडार्याचा मळवट लावून हरिनामाच्या गजरात आबालवृध्द भाविक सहभागी झालेले होते.मकरंद राजगुरु व सौ प्रिती राजगुरु.(अवसरी खुर्द).रामदास रोडे व सौ.उज्वला रोडे.(धामणी)शुभम वाघ व सौ.कोमल वाघ.(पहाडदरा) संतोष जाधव व सौ.उर्मिला जाधव (धामणी)शरद जाधव व सौ.दिपाली जाधव (धामणी)संदीप आळेकर व सौ महेश्वरी आळेकर (धामणी)विकास बढेकर व सौ.वैशाली बढेकर (जारकरवाडी)संपत सोनवणे व सौ.शितल सोनवणे (धामणी)ओंकार रोकडे व सौ.रुपाली रोकडे (धामणी)अशोक बाळासाहेब जाधव व सौ.संगिता जाधव (धामणी) या अकरा दाम्पंत्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक व त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक करुन फूल फळ पुजा करण्यास सुरुवात करण्यात आली.महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.धोंडीबा भगत.शांताराम भगत.नामदेव भगत.पांडुरंग भगत.राजेश भगत.राहुल भगत.बाळशिराम साळगट.अनिरुध्द वाळूंज.प्रमोद देखणे.सुनिल जाधव. यांनी स्वयंभू सप्तशिवलिंगावर सुंगधी अत्तर व फूल व फळ पारंपारिक पध्दतीने अर्पण केले.मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात फुलांची सजावट केलेली होती.दिवाळी पाडव्याला खंडोबाला नैवेद्य म्हणून दिवाळीचा फराळ लाडू.करंज्या.शंकरपाळ्या अनारसे इत्यादी फराळ महिला भाविक देवापुढे श्रध्देने ठेवत होत्या.दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी परिसरातील गावडेवाडी.अवसरी खुर्द.महाळूंगे पडवळ.तळेगांव ढमढेरे.लोणी.संविदणे.खडकवाडी.वडगांवपीर.पाबळ.मरकळ येथील भाविकांनी गर्दी केलेली होती.