पुणे :
वेगाने वाढणारे शहरीकरण आणि मर्यादित जागा यामुळे देशातील महानगरांमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रत्येक कुटुंबाकडे एकापेक्षा अधिक वाहने असताना, पार्किंगसाठी जागा कमी पडते आहे. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्स प्रा. लि. ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘इंटेलीपार्क – स्पेस सेविंग स्मार्ट पार्किंग सिस्टम’ विकसित केली आहे.
कंपनीचे संचालक नरेंद्र गोयल म्हणाले, “इंटेलीपार्क हे आधुनिक, सुरक्षित आणि स्मार्ट शहरांसाठी तयार केलेले भविष्यदर्शी समाधान आहे. हे सिस्टम पूर्णपणे ऑटोमेटेड असून मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्य करते. आम्ही 16 मजल्यांपर्यंत मल्टीलेव्हल पार्किंग सोल्यूशन तयार करू शकतो. या संपूर्ण प्रणालीचे संचालन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने होते, ज्यामुळे ती अधिक कार्यक्षम आणि वापरण्यास सोपी बनते.”
ते पुढे म्हणाले, “2018 पासून श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्स डिझेल जनरेटर क्षेत्रात अग्रगण्य आहे. बांधकाम क्षेत्राशी जवळीक असल्यामुळे आम्हाला शहरांतील पार्किंगची समस्या प्रकर्षाने जाणवली. त्यावर उपाय शोधण्याच्या उद्देशाने आम्ही संशोधन सुरू केले आणि त्यातून ‘इंटेलीपार्क’ची निर्मिती झाली. आज आम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे.”
कंपनीचे ऑपरेशन्स हेड गुलशन खजुरिया म्हणाले, “आमची कंपनी अमेरिकास्थित Peer Robotics सोबत काम करते. त्यामुळे या सिस्टममध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. आमची प्रणाली अॅप-आधारित असल्याने वाहन मालकासाठी ती अत्यंत सोयीची ठरते. आम्ही मल्टीलेव्हल पार्किंगसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा पुरवतो, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सानुकूलित समाधान वेळेत मिळते.”
ते पुढे म्हणाले, “‘इंटेलीपार्क’ भारतातील स्मार्ट सिटी मिशनला बळकटी देत शहरी विकासात एक नवा अध्याय लिहित आहे. वाढत्या शहरीकरणात हे सिस्टम केवळ पार्किंगची समस्या सोडवणार नाही, तर शहरी जीवन अधिक सुव्यवस्थित आणि सुलभ करेल.”
‘इंटेलीपार्क’ची प्रमुख वैशिष्ट्ये :
✅ स्पेस सेविंग डिझाईन: एका स्लॉटमध्ये दोन किंवा अधिक गाड्यांची पार्किंग
✅ पूर्णपणे ऑटोमेटेड सिस्टम: टचस्क्रीनद्वारे सोपे ऑपरेशन
✅ सुरक्षित व विश्वासार्ह: प्रगत एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान युक्त
✅ कमी मेंटेनन्स आणि सानुकूलनक्षम डिझाईन
✅ पझल, मल्टीलेव्हल आणि टॉवर सिस्टिम्स: मॉल, हॉस्पिटल आणि कॉर्पोरेट बिल्डिंगसाठी आदर्श


