पुणे,- रिदम अँड एक्सप्रेशन वर्ल्ड फेस्ट-२०२५ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ज्युनियर गटात हिंजवडी येथील ब्ल्यू रीज पब्लिक स्कूल (बीआरपीएस)ची विद्यार्थीनी श्राव्या सोईतकर ने शास्त्रीय गायनात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकावर नाव कोरले.
अखिल लोक कला सांस्कृतिक संस्था, पुणे यांच्या वतीने ही स्पर्धा मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १० ते १४ वयोगटातील ६० स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला होता. परीक्षक म्हणून साझ अकॅडमीचे प्रमुख अविनाश झादप यांच्यासह तीन मान्यवर उपस्थित होते.
श्राव्या सोईतकरच्या सुमधूर आवाजाने आणि शास्त्रीय संगीतावरील तिच्या सखोल जाणिवेने परीक्षक व प्रेक्षकांचे तिने मन जिंकली. संगीतावरील निष्ठा आणि आवड तिच्या विजया मागील प्रेरणादायी शक्ती ठरली आहे.
तिचे हे यश कष्ट आणि प्रतिभेचे प्रतीक आहे. तिच्या या यशाबद्दल मालपाणी ग्रूपचे डॉ. संजय मालपाणी, संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्रिन्सिपल सविता एच. ट्रॅव्हिस यांनी शुभेच्छा दिल्या.
रिदम अँड एक्सप्रेशन वर्ल्ड फेस्ट २०२५ आंतरराष्ट्रीय स्पर्धा
शास्त्रीय गायनात श्राव्या सोईतकर ला सुवर्णपदक
New Delhi
haze
26.1
°
C
26.1
°
26.1
°
38 %
2.1kmh
0 %
Thu
26
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
26
°
Mon
26
°


