24.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five Newsनमामी इंद्रायणी’ प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध!

नमामी इंद्रायणी’ प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध!

– आमदार महेश लांडगे यांचा “ड्रीम प्रोजेक्ट” दृष्टीक्षेपात

पिंपरी- चिंचवड – पिंपरी-चिंचवडकरासंह तमाम वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धेचे स्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना मिळाली असून, महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन-2020’ या अभियानामध्ये ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत राहिला. राज्य शासनाची पर्यावरण समिती आणि राज्य स्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी हा प्रकल्प प्रलंबित होता.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण समितीची मान्यता घेण्यासाठी सकारात्मक सहकार्य केले. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य स्तरीय तांत्रिक समितीची मान्यता देण्यासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आता निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘इस्टिमेंट कमिटी’समोर हा विषय ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता निविदा प्रसिद्ध केली आहे.  पहिल्या टप्प्यात 526 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
**

पर्यावरण प्रेमींच्या सूचनांचा अंतर्भाव…
शहर आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महानगरपालिकेच्या Master plan मध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र सदर कामामध्ये प्रस्तावित केले आहे. तसेच, Water ATM, Public Toilet, Street Furniture, Chain link fencing compound wall आणि बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.  केंद्र सरकारच्या अमृत- 2 उपक्रमांतर्गत या प्रकल्पाचे काम होणार आहे.
**


“इंद्रायणी नदी केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर आपली संस्कृती, पर्यावरण आणि शहराच्या आरोग्याशी थेट जोडलेली जीवनवाहिनी आहे. नदी सुधार प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाली. ही प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर- 2025 पासून या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असा विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे यासाठी आभार व्यक्त करतो. या प्रकल्पाद्वारे इंद्रायणी नदीला नवजीवन मिळेल, प्रदूषणमुक्त व सुरक्षित किनारे तयार होतील, तसेच नागरिकांना हरित व सुंदर नदीकाठाचा अनुभव मिळेल. आम्ही हा प्रकल्प वेळेत व गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
31 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!