13.1 C
New Delhi
Tuesday, December 2, 2025
HomeTop Five Newsपुणे विमानतळ देशात ‘टॉप २० मध्ये

पुणे विमानतळ देशात ‘टॉप २० मध्ये

आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत १९ वा क्रमांक


पुणे : देशात सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक असलेल्या पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक पटकावून ‘टॉप २०’ मध्ये स्थान मिळवले आहे. ही रँकिंग अलीकडेच ब्युरो ऑफ इमिग्रेशनने जाहीर केली.

लोहगाव येथे असलेले पुणे विमानतळ हे प्रामुख्याने संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असून, विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगसाठी वायुदलाची धावपट्टी वापरण्यात येते. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराला नैसर्गिक मर्यादा येतात. या सर्व कार्यात्मक अडचणी असतानाही पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक मिळवला आहे. पुणे विमानतळाहून दुबई आणि बँकॉक अशा केवळ दोन सेवा सुरू असताना देखील पुण्याने १९ वे स्थान मिळवणे हे उल्लेखनीय यश ठरले आहे. ही रँकिंग पुणे विमानतळावर सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि आंतरराष्ट्रीय संपर्क वाढविण्याची पुण्याची क्षमता आणि संधीही दाखवते.

पुणे शहर हे आधीच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर चाकण एमआयडीसीमधून अनेक आंतरराष्ट्रीय वाहन कंपन्या कार्यरत असल्यामुळे पुणे ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणूनही झपाट्याने विकसित होत आहे. विमानवाहतूक तज्ञांच्या मते, विद्यमान टर्मिनलचे उन्नतीकरण झाल्यामुळे प्रवाशांची सोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एरोमॉलसारख्या सुविधा व विस्तारित टर्मिनल इमारत उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना आता सुलभ आणि सोयीसुविधांनी युक्त प्रवासाचा आनंद मिळत आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने अनेक नवी विमानतळे उभारली, तसेच विद्यमान विमानतळांवरही मोठ्या प्रमाणावर उन्नतीकरणाची कामे करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत विमानतळावरील सुविधा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात उन्नत झाल्या आहेत.”

मुरलीधर मोहोळ,
खासदार
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
13.1 ° C
13.1 °
13.1 °
71 %
0kmh
0 %
Tue
25 °
Wed
24 °
Thu
24 °
Fri
24 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!