10.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रसक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल - आ. शंकर जगताप

सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल – आ. शंकर जगताप

पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडून ''अब की बार 100 पार''चा ठाम विश्वास

भाजप अॅक्शन मोड”वर :  पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी मुलाखती सुरू

पिंपरी- : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप अॅक्शन मोडवर आला आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल असल्याचे आमदार तथा पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सांगितले.


 
  भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. मंगळवारी मोरवाडी, पिंपरी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात या मुलाखती शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. या प्रक्रियेसाठी आमदार महेश लांडगे,  विधान परिषद आमदार  अमित गोरखे आणि आमदार उमा खापरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले,  आज या मुलाखतींमध्ये प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. साधारण 300 हून अधिक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. उर्वरित मुलाखती बुधवारी, 17 डिसेंबर रोजी होणार असून यामध्ये 17 ते 32 या प्रभागांचा समावेश आहे. एका प्रभागाला साधारण अर्धा तास कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

उमेदवारांचा पक्षसंघटनेतील अनुभव, जनतेशी असलेला संपर्क, सामाजिक कार्य, विकासात्मक दृष्टीकोन, संघटनात्मक बांधिलकी तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषांवर सखोल चर्चा करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकरित्या पूर्ण केली आहे.  कोणताही भेदभाव न करता प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आपली भूमिका व काम मांडण्याची संधी देण्यात आली. या पारदर्शक प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी भाजपा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे असेही जगताप यांनी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया

अनुशासन, शिस्त आणि संघटन या तीन गोष्टींवर आधारित भाजपची कार्यप्रणाली आहे.  याच कार्यप्रणालीतून योग्य, सक्षम आणि वंचित घटकापर्यंत पोहोचणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याची पक्षाची भूमिका आहे.  हीच भूमिका समोर ठेवून उमेदवार निवड प्रक्रिया पारदर्शकपणे केली जात आहे.  यातून संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखून त्यांना योग्य न्याय दिला जाणार आहे. उमेदवार निवडी बाबतचे स्पष्ट निकष पक्षाकडून देण्यात आलेले आहेत.  त्याच नुसार शहरातील कोअर कमिटी उमेदवार निवड करेल आणि त्याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती कळविली जाईल. शहराचा विकास हेच अंतिम ध्येय असल्यामुळे उमेदवारही त्याच ताकदीचे निवडण्याचा भाजपचा कल आहे

शंकर जगताप

आमदार तथा निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
10.1 ° C
10.1 °
10.1 °
87 %
2.1kmh
39 %
Wed
27 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!