इंदापूर –
जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असुन इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी ने कंबर कसली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवीन झालेल्या गट रचने नुसार शेळगाव निमसाखर पंचायत समिती गणामध्ये शेळगाव,निमसाखर, शिरसटवाडी,रुई,मराडवाडी,थोरातवाडी हि गावे येतात.
शेळगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाचे आरक्षण पडले असुन या गणा मधुन भारतीय जनता पार्टी कडून निमसाखर चे सत्यजीत रणवरे यांचे नाव चर्चेत आहे.गेली दहा ते बारा वर्षे पत्रकारीते सोबतच सामाजिक उपक्रम व या परीसराची सामाजिक, राजकीय व भौगोलिक जाण, सर्व सामान्यांन सोबत जोडली गेलेली नाळ व प्रशासनाची जाण असणारा सुशिक्षित तरुण चेहरा तसेच सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाचे आरक्षण , भारतीय जनता पार्टी , प्रविण माने जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे व तालुका अध्यक्ष राजकुमार जठार यांचे निकटवर्तीय विश्वासू व पक्षातील सर्व समावेशक चेहरा या सत्यजीत रणवरे यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळण्यासाठी जमेच्या बाजू आहेत.


