13.1 C
New Delhi
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्ररणसिंग महाविद्यालयात लेखन कार्यशाळा संपन्न

रणसिंग महाविद्यालयात लेखन कार्यशाळा संपन्न


इंदापूर –
कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने शनिवार दि. 17 जानेवारी 2026 रोजी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मा. प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. विजय काकडे,मा. युवराज खलाटे यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.या प्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. रामचंद्र पाखरे यांनी प्रास्ताविक केले.त्यात लेखन कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. प्रा.विजय काकडे यांनी कथा लेखन या विषयावरती मार्गदर्शन करून कथा कशी लिहली जाते. कथेचे भाग,शीर्षक,कथेचा शेवट यावरती आपले विचार मांडले.मा.युवराज खलाटे यांनी कादंबरी लेखन या विषयावर आपले विचार मांडले.प्राचार्य, डॉ. काळंगे यांनी सुदृढ समाजासाठी चांगल्या साहित्य निर्मितीची गरज आहे असे मत मांडले. प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मेटकरी व प्रा.पवार यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली तर प्रा. रामभाऊ कांबळे यानी छायाचित्रण केले. प्रा.सोनाली चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यशाळेसाठी प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
17 °
Thu
25 °
Fri
20 °
Sat
19 °
Sun
20 °

Most Popular

Recent Comments