13.1 C
New Delhi
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रबालकांच्या समग्र विकासासाठी पंचसूत्रडॉ. विष्णू माने यांचे मत

बालकांच्या समग्र विकासासाठी पंचसूत्रडॉ. विष्णू माने यांचे मत




पुणे, : “ शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक व तांत्रिक शैक्षणिक व्यवस्थापनातूनच बालकांचा समग्र विकास होत असतो.” असे मत सुप्रसिद्ध गर्भ संस्कार कोच डॉ. विष्णू माने यांनी व्यक्त केले.
राष्ट्रमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त गीताई ह्युमनकाईंड डेव्हलमेंट ट्रस्ट, पुणे च्या वतीने ‘संस्कार-संवाद उत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तसेच अवर मिनी गुरूकुल’  ( Our Mini Gurukul) चा शुभारंभ पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी आंतरराष्ट्रीय योग गुरू, लेखक व संशोधक डॉ. संप्रसाद विनोद, भारतीय कृषि पर्यटनाचे जनक पांडुरंग तावरे व पुरातन भारतीय शिक्षण पद्धतीचे अभ्यासक व शिक्षण तज्ज्ञ पुंडलिक वाघ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कर्मयोगी बाबाराव जोगदंड कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष माणिकराव बाबाराव जोगदंड हे होते.


या प्रसंगी रामालेक्स ग्रूप चे संचालक राम जोगदंड, गीताई चे विश्वस्त डॉ. संतोष जोगदंड, विश्वसत मनोरमा जोगदंड व मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड उपस्थित होते.
डॉ. विष्णू माने म्हणाले,“ पुरूषांच्या बरोबरीने काम करणार्‍या महिलांना आज मातृत्वाचा विसर पडला आहे. महिलांना गर्भसंस्कार दिल्यास येणारी पिढी ही संस्कारीत, हुशार व बुद्धिमान असेल. नियोजन बद्ध आणि गर्भसंस्कारीत मुलांना जन्म दिल्यास समाज सुदृढ बनेल. आज गीताई ओएमजीच्या माध्यमातून कौशल्य शिक्षण, संस्कृती आणि संस्कार घडविण्याचे काम केले जाईल.”
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले,“ शिक्षण हे सतत शिकण्याची प्रक्रिया असून त्यामधून आयुष्यभर आपण शिकत राहतो. वर्तमान काळात केवळ शिक्षण देतात परंतू कसे शिकावे याचे शिक्षण दिले जात नसल्याने त्याची आवश्यकता आहे. व्यक्ती हा अनुभवाच्या जोरावर शिकतो. त्यामुळे बालकांचा पाया मजबूत करण्यावर विशेष भर दयावा. स्वामी विवेकानंदाने आत्माविश्वास व अस्तिवाची जाणिव करुन दिली, तसे ज्ञान बालकांना देणे गरजेचे आहे.”
अविनाश जोगदंड म्हणाले,“ मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रीय व सामाजिक भान निर्माण करणे, लोकशाहीचे बळकटीकरण, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, देशप्रेम म्हणजे जबाबदारी हे समजावणे हे या गुरूकुलाचे उद्दिष्ये आहेत. त्याच प्रमाणे बालकांचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार, अनुभव व संवाद यांचा समन्वय साधणारी मुक्त, लवचिक आणि आनंददायी गुरूकुल प्रणाली उभारली आहे.”
त्यानंतर पांडूरंग तावरे व पुंडलिक वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही संस्कार व शिक्षणातून होत असल्याने गुरूकुल शिक्षण पद्धती महत्वाची आहे. तसेच पुढील काळात युवा पिढीला शेतीकडे वळविणे आवश्यक आहे.”
गीताई ह्युमनकाईंड डेव्हलमेंट ट्रस्ट
 पुणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
17 °
Thu
25 °
Fri
20 °
Sat
19 °
Sun
20 °

Most Popular

Recent Comments