13.1 C
New Delhi
Monday, February 2, 2026
HomeTop Five Newsमुळा–मुठा नदीकाठ नव्या रूपात

मुळा–मुठा नदीकाठ नव्या रूपात

संगमवाडी–बंडगार्डन प्रकल्प ९० टक्के पूर्ण

पुणे : पुणे महानगरपालिकेमार्फत मुळा–मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे टप्प्याटप्प्याने नियोजन करण्यात आले असून, शहरातून वाहणाऱ्या सुमारे ४४ किलोमीटर लांबीच्या मुळा–मुठा नदीपैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या ३.७ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

याशिवाय बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान ५.५ किलोमीटर तसेच औंध ते बालेवाडी दरम्यान ८.१ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पालगत उपलब्ध जागांमध्ये थीम पार्कसह विविध नागरी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.

सध्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, संगमवाडी परिसरातील १.५० किलोमीटर लांबीचा नदीकाठ सुधारणा ट्रॅक सर्वार्थाने पूर्ण झाला आहे. या पूर्ण झालेल्या कामाची २६ जानेवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त मा. पृथ्वीराज बी. पी. (इस्टेट), मा. पवणीत कौर (जनरल), मा. ओमप्रकाश दिवटे (विशेष) तसेच शहर अभियंता मा. प्रशांत वाघमारे उपस्थित होते. या पाहणीदरम्यान वृक्षारोपणही करण्यात आले.

पूर्ण झालेल्या १.५० किलोमीटर लांबीच्या ट्रॅकचे लोकार्पण पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. हा ट्रॅक नागरिकांसाठी सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत वापरासाठी खुला ठेवण्याचे नियोजन आहे.

महापालिकेने मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यानच्या सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उर्वरित प्रकल्पाचे लोकार्पण नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते नजीकच्या कालावधीत करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना नैसर्गिक पद्धतीने विकसित केलेला नदीकाठ परिसर चालणे, सायकलिंग, विरंगुळा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी उपलब्ध होणार असून, शहरवासीयांना सर्व सोयींयुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
13.1 ° C
13.1 °
13.1 °
100 %
1.5kmh
5 %
Sun
16 °
Mon
24 °
Tue
24 °
Wed
24 °
Thu
24 °

Most Popular

Recent Comments