31.1 C
New Delhi
Wednesday, May 20, 2026
Homeताज्या बातम्यापिंपरी-चिंचवडला नवे महापौर : रवी लांडगे बिनविरोध, उपमहापौरपदासाठी सभागृहात चुरस

पिंपरी-चिंचवडला नवे महापौर : रवी लांडगे बिनविरोध, उपमहापौरपदासाठी सभागृहात चुरस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदाचा तिढा अखेर सुटला असून, भाजपचे नगरसेवक रवी लांडगे हे बिनविरोध महापौर झाले आहेत. सोमवारी (दि. २) महापौरपदासाठी लांडगे यांनी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणताही अर्ज न आल्याने त्यांचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापौरपदाची अधिकृत घोषणा शुक्रवारी (दि. ६) होणाऱ्या महापालिका सभेमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, उपमहापौरपदासाठी मात्र निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून शर्मिला बाबर यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने या पदासाठी सभागृहात थेट लढत रंगणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, पक्षाचे ८५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३६ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. या संख्याबळाच्या आधारे भाजपच महापालिकेत सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापौर व उपमहापौर निवडीसाठी नगरसचिव कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपकडून महापौरपदासाठी रवी लांडगे, तर उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. या प्रसंगी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखेउमा खापरे, तसेच भाजपचे नवनिर्वाचित पक्षनेते प्रशांत शितोळे यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महापौरपद बिनविरोध झाले असले, तरी उपमहापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे आता शहराचे राजकीय लक्ष केंद्रित झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
29 %
1.5kmh
0 %
Wed
45 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
45 °
Sun
46 °

Most Popular

Recent Comments